नवी दिल्ली: संपूर्ण जग नव्या वर्षासह स्वागत करत असतानाच आज पहाटे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीच्या आसपासच्या परिसरात भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्यानंतर नागरीक चांगलेच घाबरले. अनेकांनी घराच्याबाहेर पळ काढला. काही काळ लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यावेळी कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. रात्री 1 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या झज्जर येथे भूकंपाचं केंद्र होतं. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.8 एवढी नोंदवण्यात आली, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.