Bihar Election Result ! 9 तासानंतर बिहारमध्ये 10 जागांचे निकाल जाहीर; तरीही भाजपलाच सर्वाधिक जागा

तब्बल नऊ तासानंतर बिहार विधानसभा निवडणुकीचे दहाच निकाल हाती आले आहेत. पहिला निकाल राजदच्या पारड्यात पडला असला तरी हाती आलेल्या निकालानुसार भाजपचेच सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहेत. (Election Commission declares results in 10 seats, BJP wins 4, RJD win 2)

Bihar Election Result ! 9 तासानंतर बिहारमध्ये 10 जागांचे निकाल जाहीर; तरीही भाजपलाच सर्वाधिक जागा
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 5:53 PM

बिहार: तब्बल नऊ तासानंतर बिहार विधानसभा निवडणुकीचे दहाच निकाल हाती आले आहेत. पहिला निकाल राजदच्या पारड्यात पडला असला तरी हाती आलेल्या निकालानुसार भाजपचेच सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहेत. (Election Commission declares results in 10 seats, BJP wins 4, RJD win 2)

निवडणूक आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे अधिकृत निकाल जाहीर केले आहेत. बिहारमधील 243 जागांपैकी 10 जागांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रत्येकी दोन तर काँग्रेस आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. याशिवाय भाजपने 70, काँग्रेसने 20, संयुक्त जनता दल 41, राष्ट्रीय जनता दलाने 67 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादीने) 12 जागांवर आघाडी घेतली आहे.

दरमयान, या निवडणुकीत भाजपसह डाव्या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे. डाव्या पक्षांचे 29 जागांपैकी 20 जागांवरील उमेदवार आघाडीवर आहेत. राजद आणि काँग्रेसच्या यांच्या महागठबंधनमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी डावे) सहभागी झाले होते. या पक्षांकडून अगिआव, अराह, अरवाल, बलरामपूर, बिभुतीपूर, दाराउली, दराऊंधा, दुमराव, घोसी, करकट, मांझी, मथिहानी, पालीगंज, तरारी,वारिसनगर, झिरादेई, बचवारा आण बखरी या जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते.

एकेकाळी बिहारमध्ये डाव्या पक्षांचे प्रचंड प्राबल्य होते. मात्र, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या आमदारांची संख्या लक्षणीयरित्या घटली होती. 2010 मध्ये माक्सर्वादी पार्टी ऑफ इंडियाला बिहारमध्ये केवळ एकच जागा जिंकता आली. तर 2015 मध्ये CPI(ML) पक्षाने एक जागा जिंकली होती. तेव्हा इतर दोन्ही डाव्या पक्षांच्या पाट्या कोऱ्या राहिल्या होत्या.

मात्र, यंदाची निवडणूक डाव्या पक्षांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. याचा फायदा महागठबंधनलाही मिळणार आहे. प्रचाराच्या काळात महागठबंधनचा आर्थिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पसरवण्यात डाव्या पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एक्झिट पोल्सनी या निवडणुकीत डाव्या पक्षांना 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आता 19 जागांवर डाव्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर असल्याने हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result ! बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे; नितेश राणेंचं ट्विट

Bihar election result 2020: बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा भाजपला मोठा फायदा, प्रचार केलेल्या सर्व जागांवर भाजप आघाडीवर

Bihar Election Result 2020 : निकालांमध्ये तेजस्वी यादव पुढे, गुगल ट्रेण्ड्मध्ये मात्र नितीश कुमारच पुढचे मुख्यमंत्री

(Election Commission declares results in 10 seats, BJP wins 4, RJD win 2)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.