पत्नी परदेशात जाऊ नये म्हणून एअरपोर्टवर इमर्जन्सी कॉल

परदेशी जाणाऱ्या पत्नीला अडवण्यासाठी एका पतीने असं कृत्य केलं की त्यामुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. पत्नीला चांगले काम मिळाल्याने ती अरब देशात जात होती.

पत्नी परदेशात जाऊ नये म्हणून एअरपोर्टवर इमर्जन्सी कॉल

नवी दिल्ली : पत्नी परदेशात जाऊ नये म्हणून एका पतीने असं कृत्य केलं की त्यामुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. पत्नीला चांगले काम मिळाल्याने ती अरब देशात जात होती. मात्र पतीचा अरब देशात जाण्यासाठी विरोध होता. पत्नीने पतीच्या विरोधात जाऊन परदेशी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पतीने थेट विमानतळावर इमर्जन्सी फोन करुन एक महिला आत्मघातकी हल्ला करण्यासाठी विमानतळात दाखल झाली असल्याचे सांगितले. नसरुद्दीन आणि राफिया अशी या पती-पत्नींची नावं आहेत.

पतीने फेक कॉल करुन अशी माहिती दिल्यामुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ राफियाला विमानतळावर अटक केली. यानंतर राफियाने आपल्या पतीने हे कृत्य का केले याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी राफियाच्या पतीला अटक केली.

नेमकं प्रकरण काय?

चेन्नईमध्ये राहणाऱ्या नसीरुद्दीनची राफिया नावाच्या महिलेसोबत मैत्री झाली. यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर राफियाला अरब देशात एक चांगली नोकरी मिळाली. पण पत्नीला परदेशात पाठवण्यासाठी पती तयार नव्हता. राफिया आपल्या पतीच्या विरोधात दिल्लीला गेली आणि पतीला फोन करुन सांगितले की, 8 ऑगस्ट रोजी मी नोकरी जॉईन करत आहे. मी अरब देशात जात आहे.

त्यानंतर पत्नी परदेशात जाऊ नये यासाठी पतीने थेट विमानतळावर इमर्जन्सी कॉल केला आणि एक महिला आत्मघातकी हल्ला करण्यासाठी विमानतळात दाखल झाली असल्याचे सांगितले. विमानतळावर असा प्रकार घडल्याने विमानतळ प्रशासनाचीही झोप उडाली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *