श्रद्धांजलीची एवढी घाई का नेत्यांना? सुमित्राताईंच्या निधनाचं थरुरांकडून ट्विट, ताई मात्र स्वस्थ ! वाचा काय घडलं?

शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. sumitra mahajan demise fake news

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:30 AM, 23 Apr 2021
श्रद्धांजलीची एवढी घाई का नेत्यांना? सुमित्राताईंच्या निधनाचं थरुरांकडून ट्विट, ताई मात्र स्वस्थ ! वाचा काय घडलं?
sumitra mahajan demise fake news

नवी दिल्लीः लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आजारी आहेत. इंदूरच्या माजी खासदार असलेल्या सुमित्रा महाजन ( Sumitra Mahajan) यांना तापाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्यांचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला. त्यांना थोडासा ताप आहे. परंतु त्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. विशेष म्हणजे सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरलीय. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. (Fake news of former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan demise)

शशी थरूर यांनीसुद्धा ते ट्विट केलं डिलीट

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी दिली होती. परंतु कैलास नावाच्या ट्विटर युजर्सने सुमित्राताई स्वस्थ असल्याचं रिट्विट करून त्यांना सांगितलं. त्यानंतर शशी थरूर यांनीसुद्धा सुमित्रा महाजन यांच्या निधनाच्या माहितीचं ट्विट डिलीट केलं.

खासदार सुप्रिया सुळेंकडूनही ट्विटरवर सुमित्रा महाजनांना श्रद्धांजली

विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही ट्विटरवर सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याचं सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. पण हे वृत्त खोट असल्याचं समजल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही ट्विट काढून टाकलंय.

देशातील इतर शहरांप्रमाणेच मध्य प्रदेशातील इंदूर शहरातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी शहरात 1781 नवीन रुग्ण सापडले. तसेच शहरातील कोविड 19 विषाणूची लागण झालेल्या लोकांची एकूण संख्या 94 हजार 549 वर पोहोचलीय. गेल्या 24 तासांत येथे कोरोनाने सात लोकांचा मृत्यू झाला.

अनावश्यकपणे फिरणाऱ्या 129 जणांना पाठवले कारागृहात

दरम्यान, इंदूरमध्ये ‘जनता कर्फ्यू’ असतानाही रस्त्यावर अनावश्यकपणे भटकताना आढळलेल्या 129 जणांना तुरुंगात पाठवण्यात आलेय. इंदूरच्या मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक राकेशकुमार भांगरे म्हणाले की, या लोकांना फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 151अन्वये (अज्ञात गुन्हे रोखण्यासाठी खबरदारीचा अटक) तुरुंगात पाठवण्यात आले. जेल प्रशासनाच्या आदेशावरून ही अस्थायी कारागृह स्नेहलगंज परिसरातील एका सामुदायिक अतिथीगृहात बनविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

सरकारच्या एका होकाराने ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार, वेदांताकडून ‘ही’ ऑफर

VIDEO: रुग्णालयात फक्त 3 तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक; मृत्यूशी लढणाऱ्या आप आमदाराची आर्त हाक

Fake news of former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan demise