वडील मुलाला फाशी देत होते, तर मुलगी व्हिडीओ काढताना दयेची भीक मागत होती!

नवी दिल्‍ली : कर्जाचा डोंगर झाल्याने एका कुटुंबाने आत्महत्येचा मार्ग निवडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरुमधील सुरेश बाबू या व्यक्तीने आपल्या मुलाला जबरदस्तीने पंख्याला अटकवून मारले. त्यावेळी आरोपीच्या मुलीने या सर्व प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शुट केला. आरोपीने पत्नीला देखील आत्महत्या करण्यासाठी तयार केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश बाबू एका खासगी कंपनीत विक्री कर्मचारी …

Family Suicide, वडील मुलाला फाशी देत होते, तर मुलगी व्हिडीओ काढताना दयेची भीक मागत होती!

नवी दिल्‍ली : कर्जाचा डोंगर झाल्याने एका कुटुंबाने आत्महत्येचा मार्ग निवडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरुमधील सुरेश बाबू या व्यक्तीने आपल्या मुलाला जबरदस्तीने पंख्याला अटकवून मारले. त्यावेळी आरोपीच्या मुलीने या सर्व प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शुट केला. आरोपीने पत्नीला देखील आत्महत्या करण्यासाठी तयार केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश बाबू एका खासगी कंपनीत विक्री कर्मचारी (सेल्‍स एक्झिक्युटीव) म्हणून काम करत होता. आरोपी सुरेश म्हणाला, “ माझ्या कुटुंबाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यात केवळ पत्नी गीता आणि मुलगा वरुणचाच मृत्यू झाला. माझ्या 17 वर्षांच्या मुलीने अलार्म वाजवला नसता, तर मी देखील आत्महत्या केली असती.”

घरात काय घडलं याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 3 मिनिटे 47 सेकेंदाच्या हा व्हिडीओ आरोपी सुरेशच्याच मुलीने काढला होता. यात वडील मुलगा वरुणला पंख्याला लकवताना दिसत आहेत. तर गीता आणि त्यांची मुलगी घरात पळत आहेत. मुलगी भावाला मारू नका, सोडून द्या, असं मराठीत वडीलांना सांगतानाही ऐकायला येत आहे. त्यानंतर तात्काळ आई गीता मुलीकडून मोबाईल ओढून घेते आणि व्हिडीओ संपतो. यानंतर लगेचच गीता यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित मुलीने हा व्हिडीओ कुणाला तरी पाठवला असेल, म्हणूनच तो व्हायरल झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी आरोपी सुरेशला अटक केले आहे.

सुरुवातीला आरोपीने वेगळाच घटनाक्रम सांगितला

आरोपी सुरेशने सुरुवातीला पोलिसांना माहिती देताना मुलाला पत्नी गीताने मारले आणि त्यानंतर आत्महत्या केल्याचे सांगितले होते. मात्र, तपासात वेगळेच सत्य समोर आले. आपल्याला मुलीने आडवले अन्यथा आपणही आत्महत्या केल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले होते. आऱोपी सुरेश आणि त्याची मुलगी वारंवार आपली साक्ष बदलत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मुलीला मानसिक धक्का बसल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना आरोपी सुरेश आर्थिक अडचणीत सापडल्याची माहिती दिली आहे. गीता अनेक घरांमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या. त्यांच्यावर जवळजवळ 5 लाख रुपयांचे कर्ज होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *