Farmers Protest LIVE: दिल्लीजवळच्या सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

हरियाणातील शेतकरी मोठ्या संख्येनं ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चात सहभागी झाले असून, त्यांनी पानिपत महामार्गावरील टोलवर रात्री मुक्काम केला. (agricultural law Delhi Chalo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:35 AM, 27 Nov 2020

नवी दिल्लीः कृषी कायद्याचा निषेध करणारे पंजाबमधील शेतकरी गुरुवारी दिल्लीजवळ पोहोचले होते. सध्या शेतकऱ्यांनी पानिपत गाठले आहे.  कोरोनामुळे दिल्लीत निदर्शनास पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला जाऊ शकत नाही. हरियाणातील शेतकरी मोठ्या संख्येनं ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चात सहभागी झाले असून, त्यांनी पानिपत महामार्गावरील टोलवर रात्री मुक्काम केला. सोनीपत-दिल्ली सीमेला छावणीचे स्वरूप आले असून, आंदोलक शेतकऱ्यांच्या चार किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.

[svt-event title=”यूपीचे शेतकरीही आंदोलनात सहभागी ” date=”27/11/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ] आता यूपीमधील शेतकरीही आंदोलनात सामील झाले आहेत. वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील शेतक-यांनी मेरठ, बागपत, मुझफ्फरनगर महामार्ग रोखला आहे. [/svt-event]

[svt-event title=”टिकरी सीमेवरील शेतकर्‍यांना रोखण्यासाठी ट्रक उभारले, ट्रॅक्टरच्या सहाय्याने आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रक बाजूला ढकलले” date=”27/11/2020,11:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, परिस्थिती बिघडली” date=”27/11/2020,11:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सिंघू सीमेवरही परिस्थिती बिघडली, अश्रुधुराचा वापर” date=”27/11/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ] सिंघूच्या सीमेवरही परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. तेथे पोलीस सातत्याने शेतकर्‍यांवर अश्रुधुराचा वापर करत आहेत. शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्यावर ठाम आहेत.

[/svt-event]
[svt-event title=”एनसीआरमधून मेट्रो दिल्लीला येणार नाही” date=”27/11/2020,9:02AM” class=”svt-cd-green” ] सध्या मेट्रो दिल्लीहून एनसीआरकडे जाईल. परंतु एनसीआरहून दिल्लीकडे मेट्रो येऊ शकणार नाही. पुढील ऑर्डरपर्यंत हा आदेश लागू राहील.

[/svt-event]

[svt-event title=”सिंघू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात” date=”27/11/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ] दिल्ली चलो निदर्शनामुळे सिंघू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात आहेत. आज दिल्लीत प्रवेश मिळावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.

[/svt-event]

[svt-event title=”महिन्याभराचं रेशन घेऊन आलो आहोत, आंदोलक शेतकऱ्यांची माहिती” date=”27/11/2020,8:34AM” class=”svt-cd-green” ] ‘आमच्याकडे जवळपास एक महिन्याचं रेशन आहे. आमच्याकडे स्टोव्ह तसेच किचनशी संबंधित इतर वस्तू आहेत. आमच्याकडे थंडीचा सामना करण्यासाठी ब्लँकेट देखील आहेत,’ अशी माहिती रॉबिनदीप सिंग यांनी दिली आहे.

[/svt-event]