Farmers Protest LIVE: …अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल : रविकांत तुपकर

शेतकरी संघटनांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. Farmers Protest LIVE: Government To Discuss With Farmers Today

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:29 AM, 1 Dec 2020

नवी दिल्लीः शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले असून, ते गेल्या 6 दिवसांपासून दिल्ली सीमेवर निदर्शने करीत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकार आज शेतक-यांशी चर्चा करणार आहे. शेतकरी संघटनांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. (Farmers Protest LIVE: Government To Discuss With Farmers Today)

[svt-event title=”अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल – रविकांत तुपकर” date=”01/12/2020,11:34AM” class=”svt-cd-green” ] शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी लाखो शेतकरी दिल्लीत 6 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. परंतु केंद्र सरकार मस्तीमध्ये आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. केंद्र सरकारने 3 दिवसांत तोडगा न काढल्यास संबंध देशातील शेतकरी तर रस्त्यावर उतरतीलच. पण महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडवू, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत शेतक-यांच्या मागण्यांवर बैठक घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले” date=”01/12/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शेतक-यांच्या मेहनतीचे आपल्या सर्वांवर कर्ज- राहुल गांधी” date=”01/12/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अंबाला येथे शेतकऱ्यांकडून ‘किसान एकता जिंदाबाद’ च्या घोषणा ” date=”01/12/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सिंघू आणि टिकरी सीमा बंद, काही ठिकाणी दुचाकी वाहनांना परवानगी” date=”01/12/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] कोणत्याही वाहतूक हालचालींसाठी टिकरी सीमा बंद आहे, दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी शेतकरी आंदोलनादरम्यान लोकांना ही माहिती दिली. बडू सराय आणि झटका या सीमा दुचाकी वाहनांसाठी खुल्या आहेत. त्याचवेळी सिंघू सीमा दोन्ही बाजूंनी बंद आहे. मुकरबा चौक आणि जीटीके रोडमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. रोहिणी, जीटीके रोड आणि एनएच 44 च्या दिशेने सिग्नेचर ब्रिजकडून बाह्य रिंग रोडकडे जाण्यास टाळा.

[/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांच्या सर्व संघटनांना बोलावल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही पंजाब; किसान संघर्ष समिती” date=”01/12/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] दिल्लीत पंजाब किसान संघर्ष समितीचे सहसचिव सुखविंदर एस सब्रान यांनी म्हटले आहे की, देशात 500हून अधिक संघटना आहेत, परंतु सरकारने केवळ 32 संघटनांना वाटाघाटीसाठी आमंत्रित केले. उर्वरित लोकांना सरकारच्या वतीने चर्चेसाठी बोलावले गेले नाही. सर्व संघटनांना बोलाविल्याशिवाय आम्ही बोलणी करणार नाही.

[/svt-event]