भारतीय रेल्वेचं सर्वात सुरक्षित वर्ष, 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाही प्रवाशाचा मृत्यू नाही

भारतीय रेल्वेसाठी आर्थिक वर्ष 2018-19 आतापर्यंतचं सर्वात सुरक्षित वर्ष ठरलं. रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 2018-19 मध्ये रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही

भारतीय रेल्वेचं सर्वात सुरक्षित वर्ष, 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाही प्रवाशाचा मृत्यू नाही
Follow us
| Updated on: Dec 26, 2019 | 4:57 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेसाठी आर्थिक वर्ष 2018-19 आतापर्यंतचं सर्वात सुरक्षित वर्ष ठरलं. रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 2018-19 मध्ये रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही (Indian Railway). भारतीय रेल्वेसाठी हे एक मोठं यश आहे. इतकंच नाही तर भारतीय रेल्वेच्या अपघातांमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे (Zero Casualties During 2018-19).

भारतीय रेल्वेने जारी केलेल्या आकड्यांनुसार, रेल्वे अपघातात धडक मारणे, गाडीत आग लागने, क्रॉसिंगमध्ये गोंधळ सारख्या घटनांमध्ये गेल्या 38 वर्षांत 95 टक्के घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2017-18 मध्ये भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये एकूण 73 अपघात झाले होते. रेल्वेद्वारे अंमलात आणल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात अशा प्रकारच्या 59 घटना घडल्या आहेत. प्रति मिलियन किलोमीटरदरन्यान अशा प्रकारच्या घटनांमध्ये 0.06 टक्क्यांनी घट झाली आहे.

रिपोर्टनुसार, वर्ष 1960-61 मध्ये या प्रकारचे 2,131 अपघात झाले होते. वर्ष 1970-71 मध्ये 840, वर्ष 1980-81 मध्ये 1,013, वर्ष 1990-91 मध्ये 532, वर्ष 2010-11 मध्ये 141 प्रकरणं समोर आली आहेत. वर्ष 1990 ते 1995 दरम्यान अशा प्रकारच्या अपघातांमध्ये 2,400 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर 4,300 प्रवासी जखमी झाले होते. वर्ष 2013 ते 2018 दरम्यान दाखल करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या रेल्वे अपघातांमध्ये 990 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 1,500 प्रवासी जखमी झाले होते.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.