Assam : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली

कोपिली नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 55,150 हून अधिक लोक पूरग्रस्त झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या पुराच्या पहिल्या तडाख्यात जिल्ह्याला मोठा फटका बसला होता.

Assam : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली
पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटलीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 3:43 PM

आसाम – मागच्या चोवीस तासात आसाम (Assam) राज्यात पूरस्थिती (flood water)अतिशय भयानक झाली आहे. 96 महसूल मंडळांसह 2,930 गावात पूर असल्याची माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 18 लाख लोकांना पूराचा सामना करावा लागत आहे. पूरात अडकलेल्या 11,881 लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात यश आले आहे. तसेच आत्तापर्यत झालेल्या मुसळधार पावसामुळे 54 लोकांनी जीव गमावला आहे अशी माहिती आसाम राज्य आपत्ती प्राधिकरणाने (Assam State Disaster Mgmt Authority) माहिती दिली आहे. मागच्या चार दिवसांपासून आराम राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. तसेच अजून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली

आसामच्या होजाई जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली. त्यामधील तीन मुले बेपत्ता झाली आहेत, तर 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे अशी माहिती तिथल्या एका अधिकाऱ्याने जाहीर केली आहे. ते म्हणाले की 24 गावकऱ्यांचा गट शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामपूर गावातून सुरक्षित ठिकाणी जात असताना रायकोटा परिसरात बुडलेल्या वीटभट्टीवर त्यांची बोट उलटली. आसाममधील 28 जिल्ह्यांमध्ये यावर्षी 18.95 लाखांहून अधिक लोक पूरग्रस्त आहेत. राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाशी संपर्क साधावा

होजईचे उपायुक्त अनुपम चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या जवानांनी 21 लोकांना पाण्यातून वाचवले आहे.त्यापैकी तीन बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे. जर लोकांना सुरक्षित ठिकाणी जायचे असेल तर त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे चौधरी म्हणाले. आम्ही त्यांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या बोटींनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.

पुराचा कहर

कोपिली नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 55,150 हून अधिक लोक पूरग्रस्त झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या पुराच्या पहिल्या तडाख्यात जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. जिल्ह्यातील 47 मदत छावण्यांमध्ये एकूण 29,745 लोकांनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.