शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राजघाटावर अन्नत्याग आंदोलन

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राजघाटावर अन्नत्याग आंदोलन

नवी दिल्ली : शेतकरी नेते अमर हबीब आणि शेतकरी संघटनेचे नेते अनंत देशपांडे यांनी 19 मार्चला दिल्लीमध्ये सरकारविरोधात एकदिवस अन्नत्याग आंदोलन केले. हे आंदोलन  शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्यामुळे करण्यात आले होते. लिबर्टी इन्स्टिट्यूटचे वरुण मित्रा आणि फौजी जनता पार्टीचे आर. एम. मलिक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या आंदोलना दरम्यान ना कोणता बॅनर आणि ना कोणत्या झेंड्यांचा वापर केला होता. महाराष्ट्रातून आलेल्या या दोन नेत्यांनी शांततापूर्ण वातावरणात अन्नत्याग आंदोलन केलं.

अमर हबीब म्हणाले, 19 मार्च 1986 रोजी महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्याने आपली पत्नी आणि मुलांसह दत्तपूर येथे त्यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी हबीब यांनी शेतकरी आत्महत्येची दखल सरकारने घ्यावी असा अर्ज करण्यात आला होता. मात्र कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांबद्दल गांभीर्यता दाखवली नाही. करपे परिवारांच्या आत्महत्येनंतर ते आतापर्यंत अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत.

महाराष्ट्रात 2017 पासून प्रत्येक जिल्ह्यात 19 मार्चला लाखो लोक एक दिवस अन्नत्याग करतात. हबीब म्हणाले, दिवसाला 40 ते 50 शेतकरी आपले प्राण गमावत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला कायदा आहे. सरकार येतं जातं मात्र कुणी हा कायदा रद्द करण्यासाठी प्रयत्न केले नाही. शेतकरी आत्महत्या ही आपली राष्ट्रीय आपत्ती आहे आणि शेतकरी विरोधी कायदा संपवण्यासठी आज राष्ट्रीय प्राथमिकता दिली पाहिजे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *