दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांचं निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

Sheila Dikshit passes away नवी दिल्ली :  दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांचं निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. शीला दीक्षित गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. एकीकडे आजाराशी झुंज देत असताना, दुसरीकडे त्यांचं संघटनात्मक काम सुरुच होतं. कालच त्यांनी पक्षात काही संघटनात्मक बदल केले होते.

शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांनी दिल्लीचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. शीला दीक्षित या 1998 ते 2013 पर्यंत सलग 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. शीला दीक्षित यांच्या जाण्याने दिल्लीच्या राजकारणासह काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ज्या वर्षी हरल्या, त्याच वर्षी मुख्यमंत्री झाल्या!

शीला दीक्षित यांना दिल्लीच्या विकासाचा चेहरा म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याच कार्यकाळात दिल्लीत अनेक विकासकामं झाली. दीक्षित यांनी महिलांच्या स्थितीबाबत संयुक्त राष्ट्राच्या आयोगात 5 वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व केलं. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात 1986 ते 1989 दरम्यान त्यांनी संसदीय कार्य राज्यमंत्रीपद सांभाळलं होतं. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या लाल बिहारी तिवारी यांनी पूर्व दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला. मात्र त्याच वर्षी शीला दीक्षित मुख्यमंत्री झाल्या.

शीला दीक्षित यांच्या पश्चात मुलगा संदीप दीक्षित आणि मुलगी लतिका सैय्यद आहेत. संदीप दीक्षित हे काँग्रेसचे खासदार होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया

दरम्यान, शीला दीक्षित यांच्या निधनाचं वृत्त समजताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला. “नुकतंच शीला दीक्षित यांच्या निधनाचं धक्कादायक वृत्त समजलं. त्यांच्या जाण्याने दिल्लीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांचं योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, कुटुंबीयांचं सांत्वन” असं केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटलं.

राष्ट्रपतींकडून श्रद्धांजली

राहुल गांधी यांच्याकडून शोक व्यक्त

शीला दीक्षित यांचा अल्पपरिचय 

  • 31 मार्च 1938 रोजी पंजाबमध्ये जन्म, सर्व शिक्षण दिल्लीत झालं
  • 1984 ते 1989 या काळात उत्तर प्रदेशातील कन्नोज लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व
  • 1986 ते 1989 या काळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं
  • दिल्लीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान, 1998 ते 2013 या 15 वर्षांच्या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्री
  • दिल्ली विधानसभेत सलग तीन वेळा स्वतःच्या नेतृत्त्वात यश मिळवलं
  • 2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्याकडून पराभव
  • 11 मार्च 2014 रोजी केरळच्या राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला, 25 ऑगस्ट 2014 ला राजीनामा दिला
  • जानेवारी 2019 मध्ये दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी
  • आयएएस विनोद दीक्षित यांच्याशी विवाह झाला. मुलं आणि पत्नीसोबत प्रवास करत असताना ट्रेनमध्ये हृदय विकाराचा झटका येऊन विनोद दीक्षित यांचं निधन झालं होतं.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *