एस. नंबी नारायणन, हेरगिरीचा आरोप ते पद्म पुरस्कार विजेता

तिरुवअनंतपुरम : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांना एकेकाळी हेरगिरीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. पण त्यांच्यावर कोणताही डाग नसल्याचं खुद्द सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आणि त्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. याच नंबी नारायणन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. देशासाठी जे केलं, ते वाया गेलं …

एस. नंबी नारायणन, हेरगिरीचा आरोप ते पद्म पुरस्कार विजेता

तिरुवअनंतपुरम : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांना एकेकाळी हेरगिरीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. पण त्यांच्यावर कोणताही डाग नसल्याचं खुद्द सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आणि त्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. याच नंबी नारायणन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. देशासाठी जे केलं, ते वाया गेलं नाही, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी पुरस्कारावर दिली.

पुरस्कारावर पहिली प्रतिक्रिया देताना नंबी नारायणन म्हणाले, “मी नक्कीच खुश आहे. मला हेरगिरीचा बळी बनवलं गेलं. त्या बातम्यांनीच मी जास्त चर्चेत राहिलो. मला लोकांची सहानुभूती मिळायला लागली होती. हा पुरस्कार मला जाणीव करुन देतो, की मी देशासाठी जे केलंय, ते वाया गेलेलं नाही.”

काय होतं हेरगिरी प्रकरण?

मालदिवचं नागरिकत्व असलेल्या मारियन रशीदा यांना ऑक्टोबर 1994 मध्ये अटक झाली. इस्रोसंबंधी महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप रशीदा यांच्यावर होता. यावेळी नंबी नारायणन क्रायोजेनिक प्रकल्पाचे संचालक होते. त्यांच्यासह इस्रोच्या इतर काही शास्त्रज्ञांना अटक करण्यात आली. त्यांच्या घराची जेव्हा झाडाझडती घेतली, तेव्हा पोलिसांना काहीही सापडलं नाही. तरीही तुरुंगवास भोगावा लागला होता. अनेक वर्षे हा खटला सुरुच राहिला.

सुप्रीम कोर्टाने सन्मान परत मिळवून दिला

या प्रकरणाची चौकशी 1994 साली सीबीआयकडे देण्यात आली. नंबी नारायणन यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याचं डिसेंबर 1994 मध्ये सीबीआयने स्पष्ट केलं. पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर एप्रिल 2017 मध्ये सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने होकार दिला. त्याचा 14 सप्टेंबरला निकाल लागला आणि कोर्टाने 50 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. ”नंबी नारायणन यांना विनाकारण अटक करुन त्रास देण्यात आला,” असं मतही कोर्टाने नोंदवलं होतं.

कोण आहेत नंबी नारायणन?

नंबी नारायणन हे नाव इस्रोच्या इतिहासात कधीही विसरलं जाणार नाही. नंबी नारायणन यांनी 1970 मध्ये पहिल्यांदाच लिक्विड फ्युल रॉकेट तंत्र सादर केलं होतं. सिव्हिलियन स्पेस प्रोग्रामला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रोचे तत्कालिन संचालक सतिश धवन यांचा नारायणन यांच्यावर मोठा विश्वास होता. विकास इंजिनचा विकास करणाऱ्या टीममध्येही नारायणन यांचा सहभाग होता, ज्याच्या मदतीने आज सॅटेलाईट लाँच केल्या जातात, चंद्रयान 1 (2008) साठीही याचाच वापर करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, एकट्या महाराष्ट्राला 12 पुरस्कार

महाराष्ट्रातल्या या 12 जणांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *