नवाज शरीफ यांना झटका, सात वर्ष कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच त्यांच्यावर 2.5 मिलियन म्हणजे जवळपास साडे 17 कोटीचा दंड ठोठावला आहे. शरीफ यांना ही शिक्षा अल-अजीजिया प्रकरणात सुनावण्यात आली आहे. तर फ्लॅगशिप गुंतवणूक प्रकरणी त्यांना क्लीन चीट देण्यात आली. इस्लामाबादच्या न्यायालयाने सोमवारी शरीफ यांच्याविरोधात सुरु असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी …

नवाज शरीफ यांना झटका, सात वर्ष कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच त्यांच्यावर 2.5 मिलियन म्हणजे जवळपास साडे 17 कोटीचा दंड ठोठावला आहे. शरीफ यांना ही शिक्षा अल-अजीजिया प्रकरणात सुनावण्यात आली आहे. तर फ्लॅगशिप गुंतवणूक प्रकरणी त्यांना क्लीन चीट देण्यात आली.

इस्लामाबादच्या न्यायालयाने सोमवारी शरीफ यांच्याविरोधात सुरु असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी हा निर्णय दिला. या प्रकरणाची सुनावणी मागील आठवड्यातच पूर्ण झाली होती, मात्र त्यावर निर्णय आज सुनावण्यात आला.


सर्वोच्च न्यायालयाने तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ यांच्यावरील दोन भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर निर्णय देण्यासाठी सोमवारपर्यंतचा वेळ दिला होता. न्यायालयाच्या निर्णयाच्या आदल्या दिवशी रविवारी शरीफ लाहौर येथून इस्लामाबादला पोहोचले.

न्यायालयात हजर होण्याआधी इस्लामाबाद येथे शरीफ यांची पार्टीसोबत बैठक झाली. यावेळी शरीफ म्हणाले, “मला कशाचीही भिती नाही. माझं मन स्वच्छ आहे. मी असं काहीही केलेलं नाही ज्यामुळे मला माझी मान खाली घालावी लागेल. मी नेहमी प्रामाणिकपणे या देशाची सेवा केली आहे.”

मागील वर्षी 28 जुलैला पनामा पेपर्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, न्यायालयाने शरीफांना पंतप्रधान पदासाठी अयोग्य घोषित केले होते. सप्टेंबर महिन्यात नवाज शरीफांवर तीन केस सुरु करण्यात आल्या, एव्हनफिल्ड प्रॉपर्टीज प्रकरण, फ्लॅगशिप इनव्हेस्टमेंट प्रकरण आणि अल-जजीजिया प्रकरण. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणांची सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

यापैकी एव्हनफिल्ड प्रॉपर्टीज प्रकरणात जुलै महिन्यात नवाज शरीफ यांना 11 वर्षांचा कारावास, त्यांची मुलगी मरीयम शरीफला आठ वर्षांचा कारावास तर जावई निवृत्त कॅप्टन मुहम्मद सफदरला एका वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

काही काळापूर्वी नवाज शरीफ यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे ते खूप दिवसांपासून पेरोलवर बाहेर आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *