अटल बिहारी वाजपेयींचा स्मृती दिन, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज प्रथम पुण्यातिथी आहे. अटल स्मृती दिनानिमित्त राजधानी दिल्लीत देशातील दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अटल बिहारी वाजपेयींचा स्मृती दिन, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Aug 16, 2019 | 8:02 AM

नवी दिल्ली :  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज प्रथम पुण्यातिथी आहे. अटल स्मृती दिनानिमित्त राजधानी दिल्लीत देशातील दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह यांनी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं.

गेल्या वर्षी म्हणजेच 16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयींचं दीर्घ आजाराने निधन झालं होतं.

वाजपेयींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्थळा वंदन करण्यासाठी त्यांची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिका यांच्यासह मित्र परिवारातील दिग्गजांनी हजेरी लावली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरुन वाजपेयींना श्रद्धांजली दिली.

मोदी सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ने गौरवलं होतं. वाजपेयी 1996 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते. त्यावेळी केवळ 13 दिवसात त्यांचं सरकार कोसळलं होतं. मग 1998 मध्ये वाजपेयी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यावेळीही त्यांचं सरकार 13 महिनेच चालले. 1999 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या वाजपेयींनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. वाजपेयी 2004 पासून प्रकृती अस्वास्थामुळे राजकारणापासून दूर होते.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.