नवरा आवडला नाही, गुजरातमध्ये चार मैत्रिणींची सामूहिक आत्महत्या

गांधीनगर : गुजरातच्या बनासकांठा येथे चार मैत्रिणींनी एकाचवेळी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देवपुरा क्षेत्रात ही दुर्दैवी घडना घडली आहे. येथील नर्मदा कालव्यात उडी घेत या मैत्रिणींनी आपले जीवन संपवले. या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळावर एक पत्र आढळून आले. या पत्रात त्यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या पोलीस या …

नवरा आवडला नाही, गुजरातमध्ये चार मैत्रिणींची सामूहिक आत्महत्या

गांधीनगर : गुजरातच्या बनासकांठा येथे चार मैत्रिणींनी एकाचवेळी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देवपुरा क्षेत्रात ही दुर्दैवी घडना घडली आहे. येथील नर्मदा कालव्यात उडी घेत या मैत्रिणींनी आपले जीवन संपवले. या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळावर एक पत्र आढळून आले. या पत्रात त्यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहे.

पोलिसांच्या तपासात या चार मैत्रिणींची ओळख उघड झाली आहे. मिनाक्षी, शिल्पा, हकी आणि जमना अशी या आत्महत्या केलेल्या मैत्रिणींची नावे आहेत. यापैकी शिल्पा आणि जमना या सख्ख्या बहिणी होत्या, तर मिनाक्षी आणि हकी या मैत्रिणी होत्या. जमना, शिल्पा आणि मिनाक्षी या विवाहित असल्याची माहिती आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे?

घटनास्थळावरुन पोलिसांना एक पत्र सापडले. यामध्ये मिनाक्षीने लिहिले की, तिला हृदयासंबंधी आजार आहे. या आजारासोबत तिला आणखी जगण्याची इच्छा नाही. म्हणून ती आत्महत्या करत आहे. तर शिल्पाने या पत्रात लिहिले की, तिला तिचा नवरा आवडत नाही. तसेच तिच्या सासरचेही तिच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून तिला जगण्याची इच्छा नाही.

माहितीनुसार, मिनाक्षी आणि शिल्पा आत्महत्या करण्यासाठी निघाल्या होत्या, तेव्हा त्यांना हकी आणि जमना भेटल्या. हकी आणि जमनाही आपल्या जीवनात समाधानी नव्हत्या. त्यामुळे या चार मैत्रिणींनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली, त्यानंतर एकमेकिंचा हात पकडत त्यांनी कालव्यात उडी घेतली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आणि त्यांना जगण्यापेक्षा मरणे अधिक चांगलं वाटत असल्याने आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट केलं.

पोलिसांना काय अंदाज वर्तवला?

मिनाक्षी आणि शिल्पा यांनी आत्महत्या करण्यासाठी कालव्यात उडी घेतली आणि त्यांना वाचवण्यासाठी हकी आणि जमनाने कालव्यात उडी घेतली. मात्र यात त्या चौघींचाही बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तरी या सामुहिक आत्महत्येमागे आणखी कुठलं कारण असू शकतं का? याचा तपास सध्या पोलिस करत आहे. मात्र या चार बहिणींच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *