राजस्थानात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन

जयपूर : राजस्थान देशातील पहिले असे राज्य असेल, जिथे महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहे. राजस्थानच्या उच्च शिक्षण विभागातर्फे जुलै 2019 मध्ये सुरु होणाऱ्या सत्रात 189 सरकारी महाविद्यालयात मोफत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावली जाणार आहे. याआधी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी काही शाळा आणि रेल्वे स्टेशनजवळ मोफत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावल्या …

राजस्थानात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन

जयपूर : राजस्थान देशातील पहिले असे राज्य असेल, जिथे महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहे. राजस्थानच्या उच्च शिक्षण विभागातर्फे जुलै 2019 मध्ये सुरु होणाऱ्या सत्रात 189 सरकारी महाविद्यालयात मोफत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावली जाणार आहे. याआधी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी काही शाळा आणि रेल्वे स्टेशनजवळ मोफत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावल्या होत्या.

सरकारकडे सॅनिटरी नॅपकिनचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. अंदाजे 2.5 कोटी रुपयांची गरज लागणार आहे. राजस्थानात एकूण 2.8 लाख मुली महाविद्यालयीन शिक्षण घेतात. यामध्ये काही मुली खूप गरीब आहेत. त्यामुळे अशा मुली सॅनिटरी नॅपकीन खरेदी करु शकत नाही, असे उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी भंवर सिंह भाटी यांनी सांगितले.

राज्यात मोफत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावण्यासाठी अनेक आरोग्यदायी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अभियान सुरु केले होते. मात्र यासाठी नवीन सरकारने पावलं उचलली आहेत. तसेच सरकराकडून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणही मोफत देण्यात येणार असल्याचा निर्णय नवीन सरकराने घेतला आहे.

याआधीच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सरकारने राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातून सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावण्याची सुरुवात केली होती. महिलांच्या आरोग्यासाठी आणि मासिक पाळीत होणारा त्रास लक्षात घेऊन वसुंधरा सरकारने सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावण्याची सुरुवात केली होती. एटीएम सारखे काम करणारी ही मशीन राज्य सरकारने 70 ठिकाणी लावली होती. यामध्ये कोणीही महिला दहा रुपये टाकून नॅपकीन घेऊ शकते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *