GHMC Election : शेलार-फडणवीस जोडगोळी हैदराबाद मोहिमेवर, मनपा जिंकण्याची जय्यत तयारी

बिहारनंतर भाजपनं हैदराबादवर लक्ष केंद्रित केलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:18 PM, 26 Nov 2020

हैदराबाद: बिहारप्रमाणेच हैदराबाद ( Hyderabad Election ) जिंकण्यासाठी भाजपानं जोरदार रणनीती आखली आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) निवडणूक 1 डिसेंबरला (hyderabad municipal elections 2020 ) होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी ते दोघेही हैदराबादला पोहोचले आहेत. (GHMC Election: Ashish Shelar And Devendra Fadnavis On Hyderabad Campaign)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Modi ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ), भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते हैदराबादेतल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिहारनंतर भाजपनं हैदराबादवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबाद पालिका निवडणुकीत स्टार प्रचारक आहेत.


बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती तयार करणारे भुपेंद्र यादव यांच्याकडे हैदराबाद महापालिका निवडणुकांची महत्त्वाची जबाबदारी पक्षाने देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या उत्तम कामगिरीमुळेच बिहारमध्ये एनडीएचा विजय झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच बिहारचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना हैदराबादेत धक्का बसला होता. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आपण एकट्यानं ग्रेटर हैदराबाद महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी तेलंगणा राष्ट्र समितीशी एमआयएमची थेट स्पर्धा आहे. तेलंगणाच्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, याचा सर्वाधिक फायदा भाजपला होऊ शकतो.
कोणत्याही प्रदेशात जेव्हा तिरंगी लढत असते, तेव्हा सर्वाधिक फायदा हा भाजपाला होतो. कारण विरोधी मतं अनेक भागांत विभागली जातात. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेत सध्या तेलंगण राष्ट्र समितीची सत्ता आहे. महापालिकेतील एकूण 150 नगरसेवकांपैकी 99 जागा तेलंगण राष्ट्र समितीकडे आहेत तर एमआयएमला 44 जागा मिळाल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने भाजप वाढत आहे, त्यावरून पक्षाचा पाया मजबूत झाल्याचं स्पष्ट होत आहे.

पवन कल्याण यांचा भाजपला 100 टक्के पाठिंबा देण्याचा निर्णय

प्रसिद्ध अभिनेते आणि जन सेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी भाजपला 100 टक्के पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते, “बिहार आणि दुब्बक (तेलंगाना पोटनिवडणूक जागा )मधील भाजपच्या विजयामुळे हे स्पष्ट होते की, देशातील प्रत्येक कोप-यातील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. हैदराबाद हे एक समृद्ध आणि विकसनशील शहर म्हणून उदयास आले आहे आणि मला फक्त भाजपचा एक उमेदवार हैदराबादचे महापौर व्हावेत, अशी मनापासून इच्छा असल्याचंही पवन कल्याण म्हणाले आहेत. (GHMC Election: Ashish Shelar And Devendra Fadnavis On Hyderabad Campaign)

अभिनेता पवन कल्याण हे 2014 मध्ये स्थापना झालेल्या जन सेना पक्षाचे अध्यक्ष आहेत, ज्याची स्थापना प्रत्येक तेलुगू भाषक व्यक्तीच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी लढण्याच्या उद्देशाने केली गेली होती. जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात हिंदू मंदिरांची लूट करण्याच्या विरोधात आवाज उठवणा-या काही लोकांपैकी पवन कल्याण असून, ते तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेत.

आता ग्रेटर हैदराबाद किंवा हैदराबादच्या काही प्रदेशातील बहुसंख्य लोक मुस्लिम आहेत आणि हे ओवेसींचे समर्थक समजले जातात. ज्यांचे नेतृत्व कट्टरपंथी इस्लामला प्रोत्साहन देणे आहे. काही दिवसांपूर्वी GHMCचे माजी महापौर आणि काँग्रेसचे माजी नेते कार्तिका रेड्डी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. 2014 पर्यंत या प्रदेशात काँग्रेसचे वर्चस्व राहिले, परंतु 2016 पर्यंत त्यांची स्थिती भाजपपेक्षा बेकार होती. 2016 च्या निवडणुकीत 4 जागा जिंकल्या होत्या.
ग्रेटर हैदराबाद हेदेखील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, कारण 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपा या प्रदेशात दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष बनला. तसेच भाजपने सिकंदराबादमधील जागादेखील जिंकली. भाजपने 17 पैकी 4 जागा जिंकल्या आणि तेलंगणा राज्यात केवळ आपला वाटा मिळविला नाही, तर मुख्य विरोधी पक्षाचा दर्जाही मिळविला. अशा पद्धतीने GHMC च्या निवडणुकीत तीन बाजूंनी आघाडी ज्या पद्धतीने सुरू आहे, त्याचा फायदा केवळ भाजपालाच होणार नाही, तर 2023 पर्यंत तेलंगणातील सत्ताधारी टीआरएसला आपली खुर्ची वाचवण्यासाठी चांगलीच दमछाक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हैदराबाद महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

  • टीआरएस – 99 जागा
  • एमआयएम – 44 जागा
  • इतर- 7 जागा
  • एकूण- 150 जागा

(GHMC Election: Ashish Shelar And Devendra Fadnavis On Hyderabad Campaign)

 

संबंधित बातम्या

‘बिहारच्या जनतेला जंगलराज नको तर विकास हवा’, बिहार निवडणूक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

बिहारनंतर पुढच्यावर्षी पाच राज्यांमध्ये निवडणूक, भाजपपुढे ‘या’ दोन राज्यांमध्ये कडवं आव्हान