Hyderabad Election Results 2020 Live Updates: हैदराबाद निवडणुकीत टीआरएस 56, भाजप 48, एमआयएम 44 जागांवर विजयी

Ghmc Election Result 2020 Live Update : एमआयएमच्या पारड्यात 10 जागा असल्या तरी निवडणुकीचं चित्र कधीही बदलू शकते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:25 PM, 4 Dec 2020
Ghmc Election Result

Ghmc Election Result 2020 Live Update :  तेलंगणा :   देशाचं लक्ष लागलेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भाजपनंही जोरदार मुसंडी मारली आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या (GHMC) 150 जागांपैकी तेलंगणा राष्ट्र समिती 56, भाजप 48, एमआयएम 44 , काँग्रेसने 2 जागा मिळवल्या आहेत. गेल्या निवडणुकीत 4 जागा मिळवलेल्या भाजपनं यंदा 48 जागांपर्यंत मजल मारली आहे.

हैदराबाद महापालिकेच्या (GHMC) 150 जागांवर एकूण 1122 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागलं होतं. यावेळी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि एमआयएमच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष (BJP) मुसंडी मारल्याचं समोर आलं आहे.  हैदराबाद निवडणूक निकालाची मतमोजणी पूर्ण झाली असून, 1 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 74.67 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी केवळ 34.50 लाख (46.55 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

30 ठिकाणी मतमोजणी केंद्रे  होती. मतमोजणीसाठी 8,152 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद केली गेली होती. निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरली जात होती, त्यामुळे निकालाबाबत संध्याकाळी उशिरा चित्र स्पष्ट झालं आहे.(Ghmc Election Result 2020 Live Update)

[svt-event title=”हैदराबादमध्ये TRS नंबर वनवर, तर भाजप तिसऱ्या स्थानी घसरले” date=”04/12/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ] टीआरएस 71 जागांवर पुढे, एआयएमआयएम 43 आणि भाजपाची 34 जागांवर घोडदौड [/svt-event]

[svt-event title=””शेतकरी आंदोलन करतायत आणि केंद्रीय मंत्री स्थानिक निवडणुकांमध्ये”” date=”04/12/2020,4:03PM” class=”svt-cd-green” ] तेलंगणा राज्य सरकारचे मंत्री टी श्रीनिवास यादव यांनी हैदराबाद महापालिका निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांद्वारे होत असलेल्या प्रचारावर हल्लाबोल केला आहे. एकीकडे शेतकरी आंदोलन करत आहेत, तर केंद्रीय मंत्री स्थानिक निवडणुकांमध्ये लुडबूड करत आहेत- तलासनी श्रीनिवास यादव

[/svt-event]

[svt-event title=”टीआरएस 66 जागांवर आघाडीवर ” date=”04/12/2020,3:51PM” class=”svt-cd-green” ] हैदराबाद महापालिका निवडणुकीत टीआरएस 66 जागांवर आघाडीवर, MIM सध्या 37 जागांवर पुढे, तर भाजप सध्या 34 जागांवर आघाडीवर, काँग्रेस थोड्या काळासाठी केवळ 3 जागांवर आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचा महापालिका निवडणुकीचा पहिला निकाल आला, MIM विजयी” date=”04/12/2020,1:40PM” class=”svt-cd-green” ] हैदराबाद महापालिका निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. मेहदीपट्टनम मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मोहम्मद मजीद हुसेन विजयी झाले. सध्या टीआरएस 47, एमआयएम 21 आणि भाजप 18 जागांवर आघाडीवर आहे. [/svt-event]

[svt-event title=”बाजी पलटली, आता टीआरएस आघाडीवर” date=”04/12/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ] हैदराबाद निवडणुकीत सध्या टीआरएस 42, एमआयएम 20 आणि भाजप 18 जागांवर आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सुरुवातीच्या ट्रेंडवर संबित पात्रांचं ट्विट” date=”04/12/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ] भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रारंभीच्या ट्रेंडविषयी ट्विट केले. यात त्यांनी भाग्यनगर लिहिले. योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे म्हटले होते.

[/svt-event]

[svt-event title=”टपाल मतपत्रिकांच्या ट्रेंडमध्ये भाजप 80 जागांवर आघाडीवर” date=”04/12/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] हैदराबादमध्ये सध्या पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू, ट्रेंडमध्ये भाजपाला बहुमत टीआरएस -34, भाजपा -80, एमआयएम -18, काँग्रेस -2 [/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद महानगरपालिका (GHMC) निवडणुकीसाठी मतमोजणी; एलबी स्टेडियम मतमोजणी केंद्राची छायाचित्रे” date=”04/12/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद निवडणुकीचा ताजा कल?” date=”04/12/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजप सध्या 74 जागांवर आघाडीवर आहे. टीआरएस 32, एमआयएम 13 वर पुढे आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीआरएसला 100 जागा जिंकण्याची अपेक्षा” date=”04/12/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ] टीआरएस नेत्याचे केव्हीके म्हणाले, ‘आमच्या पक्षाला 100 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे अनेक बडे नेते येथे आले आणि बनावट खोट्या गोष्टी बोलल्या, पण हैदराबादच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि केसीआर यांच्यावर विश्वास दाखविला याचा आनंद आहे. ‘

[/svt-event]

[svt-event title=”जुन्या मलकापेट जागेवर पुन्हा मतदान” date=”04/12/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] हैदराबादच्या जुने मालकापेट येथे 3 डिसेंबरला पुन्हा मतदान झाले होते. तेथे 38.46 टक्के मतदान झाले. मतपत्रिकेवर सीपीएम उमेदवाराचे नाव नव्हते, म्हणून 1 डिसेंबर रोजी मतदान रद्द करण्यात आले होते. [/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद: महानगरपालिका निवडणूक 2020 निकाल/आघाडी” date=”04/12/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] भाजपाः 62, टीआरएस: 31, एआयएमआयएम: 10, काँग्रेस: 1, इतर: 0 [/svt-event]

पवन कल्याण यांचा भाजपला 100 टक्के पाठिंबा देण्याचा निर्णय

प्रसिद्ध अभिनेते आणि जन सेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी भाजपला 100 टक्के पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते, “बिहार आणि दुब्बक (तेलंगाना पोटनिवडणूक जागा )मधील भाजपच्या विजयामुळे हे स्पष्ट होते की, देशातील प्रत्येक कोप-यातील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. हैदराबाद हे एक समृद्ध आणि विकसनशील शहर म्हणून उदयास आले आहे आणि मला फक्त भाजपचा एक उमेदवार हैदराबादचे महापौर व्हावेत, अशी मनापासून इच्छा असल्याचंही पवन कल्याण म्हणाले आहेत.

ग्रेटर हैदराबाद हे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, कारण 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपा या प्रदेशात दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष बनला होता. तसेच भाजपने सिकंदराबादमधील जागादेखील जिंकली. भाजपने 17 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या आणि तेलंगणा राज्यात केवळ आपला वाटा मिळविला नाही, तर मुख्य विरोधी पक्षाचा दर्जाही मिळविला. अशा पद्धतीने GHMC च्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं तिरंगी लढत होत आहे, त्याचा फायदा केवळ भाजपालाच होणार नाही, तर 2023 पर्यंत तेलंगणातील सत्ताधारी टीआरएसलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

आता ग्रेटर हैदराबाद किंवा हैदराबादच्या काही प्रदेशातील बहुसंख्य लोक मुस्लिम आहेत आणि हे ओवेसींचे समर्थक समजले जातात. ज्यांचे नेतृत्व कट्टरपंथी इस्लामला प्रोत्साहन देणे आहे. काही दिवसांपूर्वी GHMCचे माजी महापौर आणि काँग्रेसचे माजी नेते कार्तिका रेड्डी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. 2014 पर्यंत या प्रदेशात काँग्रेसचे वर्चस्व राहिले, परंतु 2016 पर्यंत त्यांची स्थिती भाजपपेक्षा बेकार होती.

हैदराबाद महापालिकेतील 2015चं पक्षीय बलाबल

  • टीआरएस – 99 जागा
  • एमआयएम – 44 जागा
  • भाजप – 4
  • काँग्रेस- 2
  • टीडीपी- 1
  • इतर- 7 जागा
  • एकूण- 150 जागा