गोव्यात प्रवेशापूर्वी ‘कोरोना’ चाचणी बंधनकारक नाही, मुख्यमंत्र्यांची नवी नियमावली

"गोव्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व जणांची चाचणी करणे कठीण होत आहे" असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर सांगितलं. (New SOP for Goa Says COVID Test Not mandatory)

गोव्यात प्रवेशापूर्वी 'कोरोना' चाचणी बंधनकारक नाही, मुख्यमंत्र्यांची नवी नियमावली
Follow us
| Updated on: Jun 09, 2020 | 10:33 AM

पणजी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कायम असताना गोवा सरकारने राज्यात प्रवेश करु इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली बदलली आहे. गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी ‘कोरोना’ चाचणी बंधनकारक नसेल. ज्यांना कोरोना चाचणी करायची नाही, त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा पर्याय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. (New SOP for Goa Says COVID Test Not mandatory)

ज्यांना गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी करायची असेल, त्यांनी अहवाल येईपर्यंत 14 दिवस सशुल्क संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये राहावे. मात्र चाचणी करायची नसल्यास 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा पर्याय असेल. त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि स्थानिक प्रशासन देखरेख करेल. दहा जून म्हणजेच उद्यापासून नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) लागू होईल.

प्रमोद सावंत यांच्या बैठकांचा सिलसिला सोमवारी दिवसभर चालला. “गोव्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व जणांची चाचणी करणे कठीण होत आहे. त्यामुळे चाचण्यांचे अहवाल साचले (बॅकलॉग) आहेत” असं सावंत यांनी बैठकीनंतर सांगितलं.

हेही वाचा : कोव्हिड योद्धे CISF जवानांनी घरं रिकामी करा, खारघरच्या सोसायटीचा फतवा

“जवळपास 2500 चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आम्ही दररोज दीड ते दोन हजार चाचण्या घेत आहोत. जे यापुढेही सुरु राहतील, परंतु आम्हाला आगमनासाठी कार्यप्रणाली बदलली पाहिजे” असे सावंत म्हणाले. प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल, लक्षणे आढळली, तर मात्र कोविड चाचणी अनिवार्य असेल.

वास्कोमधील हॉटस्पॉट मंगोर हिलबद्दल बोलताना सावंत म्हणाले की, गोव्यातील 300 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 25 वगळता सर्व या (मंगोर हिल) भागातील आहेत. मात्र केवळ 19 रुग्णांनाच उपचारांची आवश्यकता आहे. उर्वरित लक्षणविरहित आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

(New SOP for Goa Says COVID Test Not mandatory)

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.