50 लाखात तरुणीची खरेदी करुन लैंगिक शोषण, काँग्रेस आमदारावर पोक्सो अंतर्गत कारवाई

गोव्यातील काँग्रेस आमदार अतानासियो मोनसेराते यांच्यावर अखेर कारवाई होणार आहे. कोर्टाने खटला रद्द करण्याची मागणी फेटाळल्यामुळे आता 12 जूनला आरोप निश्चिती केली जाणार आहे. 50 लाखात तरुणीची खरेदी करुन तिचं लैंगिक शोषण केल्याचा आमदारावर आरोप आहे.

50 लाखात तरुणीची खरेदी करुन लैंगिक शोषण, काँग्रेस आमदारावर पोक्सो अंतर्गत कारवाई

पणजी : गोव्यातील काँग्रेस आमदार अतानासियो मोनसेराते यांना कोर्ट ट्रायलला सामोरं जावं लागणार आहे. खटला रद्द करण्याची त्यांची याचिका गोव्यातील कोर्टाने फेटाळली आहे. अतानासियो मोनसेराते यांच्यावर 2016 मध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अतानासियो मोनसेराते यांनी आपल्याला 50 लाखात खरेदी करुन लैंगिक शोषण केल्याचा आरोप अल्पवयीन पीडितेने केला होता. लैंगिक शोषण करण्यापूर्वी मुलीला ड्रग सेवन करण्यासाठी जबरदस्ती केल्याचाही आरोप आहे.

या आरोपांनंतर अतानासियो मोनसेराते यांना आठवडाभर तुरुंगात रहावं लागलं होतं. पण नंतर जामिनावर ते बाहेर आले. कोर्टाच्या आदेशानंतर आता अतानासियो मोनसेराते यांच्यावर 12 जूनला आरोप निश्चित केले जातील. एका दुसऱ्या प्रकरणात गेल्या आठवड्यातच पोलिसांनी अतानासियो मोनसेराते यांच्यासह इतर दोघांवर महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी अतानासियो मोनसेराते यांच्यावर आता पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे. पण अतानासियो मोनसेराते यांनी सुरुवातीपासूनच आरोप फेटाळले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी गोवा सरकारकडून कट रचला जात जात असल्याचा आरोप अतानासियो मोनसेराते यांनी केला होता.

आयएएनएसच्या वृत्तानुसार, अतानासियो मोनसेराते हे पक्ष बदलण्यासाठी ओळखले जातात. एप्रिल 2019 मध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजकीय कारकीर्दीची सुरुवात युनायटेड गोवा डेमोक्रेटिक पक्षातून सुरु केली होती. 2004 मध्ये अतानासियो मोनसेराते यांनी भाजपात प्रवेश केला, पण 2007 मध्ये पुन्हा घरवापसी केली. काही वर्षांनी ते काँग्रेसमध्ये आले, पण 2015 मध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. यानंतर त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *