नेमबाजीत राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल जिंकलं, मात्र गरीबीमुळं भजे विकण्याची वेळ

गरीबीमुळे तरुणांना आपल्यातील प्रतिभा बाजूला ठेऊन पोटाचेच प्रश्न साडवावे लागतात. असंच एक उदाहण म्हणजे झारखंडच्या धनबादमधील तेलीपाडाची राष्ट्रीय खेळाडू ममता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:49 PM, 3 Mar 2021
नेमबाजीत राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल जिंकलं, मात्र गरीबीमुळं भजे विकण्याची वेळ

नवी दिल्ली : माणसातील कलागूण कुणा एकाची मक्तेदारी नसते असं म्हणतात. याला दुजोरा देणारी अनेक उदाहरणंही आपल्या आजूबाजूला दिसतात. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असताना यश मिळवलेली उदाहरणं तशी अपवादानेच पाहायला मिळतात. यातील बहुसंख्य तरुण तर परिस्थितीच्या रेट्यामुळे कलागूण असूनही मागे राहतात. या व्यक्तींना आपल्या स्वप्नांचा पाठलाग बंद करुन दररोजच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा लागतो. गरीबीमुळे अशा तरुणांना आपल्यातील प्रतिभा बाजूला ठेऊन पोटाचेच प्रश्न साडवावे लागतात. असंच एक उदाहण म्हणजे झारखंडच्या धनबादमधील तेलीपाडाची राष्ट्रीय खेळाडू ममता (Gold Medal winner Archery player unable to complete her dream due to financial situation).

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असलेल्या ममताला आपला खेळ सोडून उपजीविकेसाठी आपल्या गावी भजी विकण्याची वेळ आलीय. ममताने राष्ट्रीय स्तरावर अंडर-13 नेमबाजी (Archery) स्पर्धेत गोल्ड मेडलं जिंकलं. मात्र, आर्थिक परिस्थिती खराब असल्याने तिला आपल्या गावीच दररोजचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावं लागत आहे.

13 वर्षीय ममता सध्या धनबादमधील आपल्या गावी घरच्यांना कामात मदत करत आहे. घरची परिस्थिती खराब असल्याने ती भजे आणि भेळ विकण्याच्या कामात कुटुंबीयांना मदत करते. ममता मागील वर्षी “सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्चरी या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये ही संस्था बंद झाली आणि तिला घरी परतावं लागलं. त्यानंतर तिला पुन्हा तेथे जाताच आलं नाही. आता तिला आपल्या घरीच छोटी मोठी कामं करुन उपजीविकेचा प्रश्न सोडवावा लागत आहे.

दररोज केवळ 100-200 रुपयांची कमाई

ममता म्हणते, “मी अंडर-13 स्पर्धेत गोल्ड मेडल जिकलंय. नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मी पहिली आली आहे. याशिवाय अनेक स्पर्धांमध्ये मी सहभाग घेतलाय. मात्र, आर्थिक परिस्थिती खराब असल्याने मदत न मिळाल्याने माझा खेळ थांबला. घरची स्थिती दिवसेंदिवस खराब होतेय. त्यामुळे मलाच दुकानावर भेळ आणि भजी विकावी लागतात.’ ममताला दिवसभर हे काम केल्यानंतर 100-200 रुपयांची कमाई होते. या पैशांवर तिचं घर कसंबसं चालतं. दुसरीकडे धनबाद आर्चरी असोसिएशनकडून आपण ममताला मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्टीकरण आलंय.

हेही वाचा :

भारतीय सैन्यातील जवानाचा जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत दबदबा

धावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम

सीआयएसएफमधून सात कुत्र्यांची निवृत्ती, गोल्ड मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

व्हिडीओ पाहा :

Gold Medal winner Archery player unable to complete her dream due to financial situation