किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? सरकार म्हणतं, आम्हाला माहित नाही!

नवी दिल्ली : देशभरातील शेतकरी अवकाळी, दुष्काळी यांसह विविध नैसर्गिक संकटांशी झुंजत असताना, सरकारी अनास्थाही अनेकदा त्यांच्या वाटेला येते. अशातच केंद्रीय कृषिमंत्र्यांनी आपण किती हलर्गजीपणा करतोय, याचेच दर्शन दिले. देशात गेल्या तीन वर्षात किती शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, याची माहितीच केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे नाही. आम्हाला शेतकरी आत्महत्येची आकडेवारी नाही, असे भर लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदाराच्या प्रश्नाला उत्तर …

किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? सरकार म्हणतं, आम्हाला माहित नाही!

नवी दिल्ली : देशभरातील शेतकरी अवकाळी, दुष्काळी यांसह विविध नैसर्गिक संकटांशी झुंजत असताना, सरकारी अनास्थाही अनेकदा त्यांच्या वाटेला येते. अशातच केंद्रीय कृषिमंत्र्यांनी आपण किती हलर्गजीपणा करतोय, याचेच दर्शन दिले. देशात गेल्या तीन वर्षात किती शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, याची माहितीच केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे नाही. आम्हाला शेतकरी आत्महत्येची आकडेवारी नाही, असे भर लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले.

नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतीमालास हमीभाव न मिळणे इत्यादी कारणांमुळे देशभरात विविध राज्यात शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत, आपलं जीवन संपवलं. या शेतकरी आत्महत्येची आकडेवारी सरकारकडे असायला हवी आणि आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने पावलं उचलायला हवीत, अशी माफक अपेक्षा जनतेची असताना, आपल्याकडे शेतकरी आत्महत्येची आकडेवारी नसल्याचे सांगत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी हातच वर केले आहेत.

2016 ते 2018 या तीन वर्षांत देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची आकडेवारी कृषिमंत्रालयाकडे नसल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनीच तशी लोकसभेत कबुली दिली आहे. झालं असं की, तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी लोकसभेत प्रश्न विचारला होता की, “2016 पासून डिसेंबर 2018 पर्यंत म्हणजे गेल्या तीन वर्षात देशभरात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या?”

नॅशनल क्राइम ब्युरोकडून (एनसीआरबी) देशभरातील आत्महत्यांची माहिती दिली जाते. या सरकारी संस्थेकडून आकडेवारीचा अहवाल येतो. या संस्थेने 2016, 2017 आणि 2018 या तीन वर्षांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची आकडेवारीच दिली नाही.

आता या संस्थेकडून शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी घेऊन, आगामी काळात आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा असताना, आपल्याकडे आकडेवारीच नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी कबुली दिल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जातो आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचेही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नमूद केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *