कांद्याच्या किमती वाढू नये म्हणून केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयातीवरील अटींमध्ये सूट

केंद्र सरकारने आज (21 ऑक्टोबर) भारतातील कांद्याचे दर कमी व्हावेत यासाठी कांदा आयातीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे.

कांद्याच्या किमती वाढू नये म्हणून केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयातीवरील अटींमध्ये सूट

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज (21 ऑक्टोबर) भारतातील कांद्याचे दर कमी व्हावेत यासाठी कांदा आयातीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. यामुळे बाहेरील देशांमधून कांदा सहजपणे भारतात येऊन कांद्याच्या किमती कमी करण्यास मदत होणार आहे. याशिवाय केंद्र सरकार कांदा भंडारांमधून (बफर स्टॉक) अधिक प्रमाणात कांदा बाजारात आणणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांदा दरावर विपरीत परिणाम होणार आहे (Government relaxes important norms for onion import to reduce prices).

केंद्र सरकारने म्हटलं आहे, “कांदा आयातीला सहजसोपं बनवण्यासाठी 21 ऑक्टोबर 2020 रोजी आयातीसाठी प्लांट क्वारंटाईन ऑर्डर, 2003 अंतर्गत फायईटोसेन्टरी सर्टिफिकेटवर फ्यूमिगेशन आणि अतिरिक्त घोषणेच्या अटींमध्ये सूट देण्यात आली आहे. ही सूट 15 डिसेंबर 2020 पर्यंत असणार आहे.”

केंद्र सरकारने भारतीय उच्च आयुक्तांना संबंधित देशांमध्ये व्यापाऱ्यांशी संपर्क करुन कांदा आयात वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. आयात करण्यात आलेला हा कांदा पीएससीवर फ्यूमिगेटशिवाय भारतीय बंदरात दाखल होणार आहे. तो भारतात आल्यावर आयात करणाऱ्याकडून फ्यूमिगेट करण्यात येईल. आयात करणाऱ्यांवर या कांद्याचा उपयोग केवळ वापरासाठी करण्याचे निर्बंध असणार आहेत. त्यामुळे हे कांदे साठवण करुन व्यापाऱ्यांना ठेवता येणार नाहीये.

सरकारने रब्बी हंगामात उत्पादन झालेल्या कांद्याचा बफर स्टॉक तयार केला आहे. कांद्याच्या किमती कमी होण्यासाठी या बफर स्टॉकमधील कांदे सप्टेंबर 2020 पासून बाजारात आणला जात आहे. आगामी काळात केंद्रीय भंडार, एनसीसीएफ आणि राज्य सरकारांसाठी देखील याबाबत काम केलं जाणार आहे.

पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळेच सध्या बाजारात कांद्याचे दर (Onion Price) सातत्याने वाढत आहेत. नवरात्रीत उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये कांदा खाल्ला जात नाही. यामुळे कांद्याची मागणी घटते. मात्र, असं असतानाही यंदा कांद्याच्या किमतीत कोणतीही घट झालेली नाही. मुंबईच्या बाजारात कांदा 67 रुपये प्रति किलो, चेन्नईत 73 रुपये, दिल्लीत 51 रुपये आणि कोलकात्यात 65 रुपये प्रति किलो आहे.

हेही वाचा :

परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात, जेएनपीटी बंदरात 600 टन कांदा दाखल

कांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा

Ban On Onion Export | निर्यातबंदी उठेपर्यंत कांद्याचा लिलाव बंदच, केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

Government relaxes important norms for onion import to reduce prices

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *