15 ऑगस्टला उत्कृष्ट पोलीस म्हणून सत्कार, 16 तारखेला लाच घेताना पकडलं

तेलंगणामध्ये एका पोलिसाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या 24 तासापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट या दिवशी 'बेस्ट कॉन्स्टेबल' पुरस्काराने या पोलिसाला सन्मानीत करण्यात आलं होतं.

15 ऑगस्टला उत्कृष्ट पोलीस म्हणून सत्कार, 16 तारखेला लाच घेताना पकडलं

हैदराबाद : तेलंगणामध्ये एका पोलिसाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या 24 तासापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट या दिवशी ‘बेस्ट कॉन्स्टेबल’ पुरस्काराने या पोलिसाला सन्मानीत करण्यात आलं होतं. पल्ले थिरुपती रेड्डी असं या पोलिसाचं नाव आहे.

थिरुपती हे मेहबूबनगरच्या 1 टाऊनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उत्पादन शुल्क मंत्री श्रीनीवास गौड यांच्या हस्ते रेड्डी यांचा ‘बेस्ट कॉन्स्टेबल’ म्हणून सत्कार करण्यात आला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राम राजेश्वरीही उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्यानंतर रेड्डी हे चर्चेत आले. पण दुसऱ्या दिवशी रेड्डी यांना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ लाच घेताना पकडले. 17 हजार रुपयांची लाच घेताना पडकल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी हा पोलीस त्यांना धमकावून दबाव घालत लाच घेत होता, असं सांगितले जात आहे.

“लाच देण्यासाठी पोलिसाने अनेकदा दबाव टाकला होता. माझ्याकडे वाळू ट्रान्सपोर्ट करण्यासंबधित सर्व कागदपत्र असतानाही माझ्याकडून पैसे मागितले जात होते”, असं तक्रारदार रमेश यांनी सांगितले.

अँटी करप्शन ब्युरो पथकाने रेड्डी यांना अटक करुन कोर्टात दाखल केले. यानंतर कारवाई करत त्यांना न्यायालय कोठडीत पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यातही अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी 93.5 लाख रुपये आणि 400 ग्राम सोनं जप्त केले होते. या अधिकाऱ्यालाही दोन वर्षापूर्वी ‘बेस्ट तहसीलदार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *