VIDEO : हनुमान दलित नव्हे, जैन आहे : आचार्य निर्भय सागर

राजस्थान : हनुमान दलित होता, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्यानंतर, देशभरात हनुमानाच्या जातीची चर्चा सुरु झाली आहे. हनुमान दलित नसून, आदिवासी होता, असं मत अनेकांनी मांडलं आहे. आता राजस्थानमध्ये जैन आचार्य निर्भय सागर यांनी हनुमान जैन असल्याचा दावा केला आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचं व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. …

VIDEO : हनुमान दलित नव्हे, जैन आहे : आचार्य निर्भय सागर

राजस्थान : हनुमान दलित होता, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्यानंतर, देशभरात हनुमानाच्या जातीची चर्चा सुरु झाली आहे. हनुमान दलित नसून, आदिवासी होता, असं मत अनेकांनी मांडलं आहे. आता राजस्थानमध्ये जैन आचार्य निर्भय सागर यांनी हनुमान जैन असल्याचा दावा केला आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचं व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय म्हणाले जैन आचार्य निर्भय सागर?

राजस्थानमध्ये 7 डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज तक या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने आचार्य निर्भय सागर यांना विचारलेल्या प्रश्नावर हनुमान जैन असल्याच्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, समसदढच्या पंचाबालयती जैन मंदिरात माध्यमांसोबत बोलतांना हा दावा केला.

निर्भय सागर म्हणाले की, जैन धर्मात असे अनेक ग्रंथ आहेत की, ज्यात हनुमानबाबतच्या गाथा जोडल्या गेल्या आहेत. तसेच निर्भय सागर यांनी हनुमान हे जैन धर्मानुसार पहिले क्षत्रिय असल्याचं सांगितलं. हनुमानने संन्यास स्वीकारल्यानंतर हनुमानाने जैन धर्माची दिक्षा घेतली, असंही निर्भय सागर म्हणाले.

हनुमान दलित होता : योगी आदित्यनाथ

हनुमान दलित होता की अदिवासी हे सर्व प्रकरण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याने सुरु झालं. उत्तर प्रदेशमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं असं बोललं जात आहे.

“हनुमान एक असे देवता आहेत की, ते स्वत: दलित आहेत. हनुमानने दक्षिण भारतापासून ते उत्तर भारतापर्यंत सर्वांना जोडण्याचे काम केलं. त्यामुळे आपला संकल्प हा हनुमानासारखा असायला हवा.” असं मत योगी आदित्यनाथ यांनी मांडलं.


संबंधित बातम्या : VLOG : हनुमान दलित होता?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *