Harley-Davidson चा भारताला अलविदा, उत्पादन थांबवलं

मोटरसायकल बनवणारी जगातील दिग्गज कंपनी हार्ले डेविडसनने (Harley-Davidson) भारतातील आपल्या व्यवसायाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Harley-Davidson चा भारताला अलविदा, उत्पादन थांबवलं

नवी दिल्ली : मोटरसायकल बनवणारी जगातील दिग्गज कंपनी हार्ले डेविडसनने (Harley-Davidson) भारतातील आपल्या व्यवसायाबाबत मोठा निर्णय घेतला आहे (Harley Davidson stop production unit of Bawal plant in Haryana). कंपनीने भारतातील आपल्या गाड्यांचं उत्पादन थांबवलं आहे. त्यानुसार लवकरच हरियाणातील बावलचं हार्ले डेविडसनचं केंद्र बंद करण्यात येणार आहे. गुरगावमधील कंपनीच्या सेल्स ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली जाणार आहे.

इतकंच नाही हार्ले डेविडसनकडून भारतातील आपल्या ग्राहकांना देखील या निर्णयाची माहिती दिली जात आहे. कंपनीने म्हटलं, “भविष्यातील काही घडामोडींची ग्राहकांना माहिती दिली जात आहे. हार्ले डेविडसनच्या डीलर नेटवर्ककडून करारानुसार ग्राहकांना सेवा दिली जाईल.” पुढील काळात हार्डे डेविडसन भारतातील व्यवसायासाठी भागिदारीचा पर्याय देखील घेऊ शकते.

कंपनीच्या या निर्णयामुळे जवळपास 70 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. 23 सप्टेंबर 2020 पासून पुढील 12 महिन्यात संबंधित निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. हार्ले डेविडसन स्ट्रीट 750, आयरन 883 सारख्या अनेक मोटरसायकलचा उत्पादन करते. 2020 मध्ये रिस्ट्रक्चरिंगसाठीच्या गुंतवणुकीची किंमत 75 मिलियन डॉलरपर्यंत जाऊ शकते, असा कंपनीचा अंदाज आहे.

भारतात विक्रीत घट

हार्ले डेविडसनच्या भारतातील विक्रीत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. आर्थिक वर्ष 2019 मध्ये हार्ले डेविडसन बाईक्सची विक्री 22 टक्क्यांनी कमी झाली होती. कंपनीला या वर्षी केवळ 2 हजार 676 गाड्या विकता आल्या. त्याआधीच्या वर्षी 3 हजार 413 गाड्यांची विक्री झाली होती. भारतात विक्री होणाऱ्या गाड्यांपैकी 65 टक्के गाड्या 750CC पेक्षा कमी क्षमतेच्या आहेत.

संबंधित बातम्या :

Harley Davidson ची भारतातली पहिली ई-बाईक, किंमत तब्बल…

हार्ले डेविड्सनची किंमत वाढवल्यामुळे ट्रम्प भारतावर नाराज

Harley Davidson stop production unit of Bawal plant in Haryana

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *