Triple talaq : मुलगी झाल्याने पतीकडून पत्नीला तिहेरी तलाक

पत्नीने मुलीला जन्म दिल्यामुळे पतीने पत्नीला तलाक (Triple talaq haidrabad) दिला. पतीच्याविरोधात पत्नीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

Triple talaq : मुलगी झाल्याने पतीकडून पत्नीला तिहेरी तलाक

हैद्राबाद : देशात पुन्हा एकदा तिहेरी तलाकाची (Triple talaq haidrabad)  घटना समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या हैद्राबाद येथे घडली. पत्नीने मुलीला जन्म दिल्यामुळे पतीने पत्नीला तलाक (Triple talaq haidrabad) दिला. पतीच्याविरोधात पत्नीने पोलिसांत धाव घेत तक्रार (Triple talaq haidrabad) दाखल केली आहे. त्यासोबतच सासरच्या लोकांवरही तिने हुंड्यासाठी त्रास देत असल्याचा आरोप केले आहेत.

“माझे 2011 रोजी लग्न झाले होते. पण काही महिन्यानंतर पती आणि सासू-सासऱ्यांनी मला हुंड्यावरुन त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच मी मुलीला जन्म दिल्यानंतर सासरच्या लोकांनी माझा शाररिक छळही केला. पतीने 14 नोव्हेंबर रोजी मला तिहेरी तलाक दिला.”, असे पीडित महिलेने सांगितले.

महिलेच्या तक्रारीवरुन तिच्या सासरच्या लोकांवर कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडा मागितल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, लोकसभेमध्ये 1 ऑगस्ट 2019 रोजी तिहेरी तलाक कायदा संमत झाला. हा कायदा संमत झाल्यानंतर देशातील पहिला गुन्हा ठाण्यातील मुंब्रा येथे एका व्यक्तीवर दाखल झाला आहे. यामध्ये पतीने व्हॉट्सअॅपवरुन एका उच्चशिक्षित महिलेला तीन तलाक दिला होता. त्यामुळे महिलेने थेट पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.

‘या’ देशातही तिहेरी तलाकला बंदी

तिहेरी तलाकला अनेक मुस्लीम देशांमध्येही बंदी आहे. ट्युनिशिया, अल्जेरिया, मलेशिया, जॉर्डन, इजिप्त, इराण, इराक, ब्रुनेई, यूएई, इंडोनेशिया, लिबिया, सुदान, लेबनन, सौदी अरेबिया, मोरक्को आणि कुवैत या देशांमध्ये तिहेरी तलाक अवैध आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *