लडाखमध्ये तुफान बर्फवृष्टी, स्कॉर्पिओ आणि 10 पर्यटक अडकले

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील खारदुंगला भागात तुफान बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. दहा पर्यटक सध्या बेपत्ता असून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या पर्यटकांची वाहनेही बर्फाखाली अडकली. अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एक एसयूव्ही आणि इतर छोट्या गाड्या बर्फाखाली अडकल्या आहेत. घटनेनंतर एसडीआरएफ, भारतीय जवान आणि …

लडाखमध्ये तुफान बर्फवृष्टी, स्कॉर्पिओ आणि 10 पर्यटक अडकले

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील खारदुंगला भागात तुफान बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. दहा पर्यटक सध्या बेपत्ता असून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या पर्यटकांची वाहनेही बर्फाखाली अडकली. अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एक एसयूव्ही आणि इतर छोट्या गाड्या बर्फाखाली अडकल्या आहेत.

घटनेनंतर एसडीआरएफ, भारतीय जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलंय. सतत बर्फवृष्टी सुरु असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे लडाखमधील सध्याचं तापमान उणे 20 ते 30 डिग्रीच्या दरम्यान आहे.

हवामान विभागाने संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर इशारा जारी केला आहे. 19 ते 25 जानेवारी दरम्यानही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बचाव पथकाकडून अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

लडाख क्षेत्रातील खारदुंगला भाग समुद्रसपाटीपासून 18300 फूट उंचीवर आहे. लेहच्या उत्तरेला हा भाग असून लेहपासून 40 किमी अंतरावर आहे. श्रीनगरपासून खारदुंगलाची उंची 850 किमी आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *