जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती, हायअलर्ट जारी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती, हायअलर्ट जारी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर, संपूर्ण राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीनगरच्या राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान हल्ल्याची शक्यता असून, या हल्ल्यासाठी बाईकचा वापर केला जाऊ शकतो, अशीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आली असून, जवानांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या अलर्टनंतर आज सकाळी 9 वाजल्यापासून महामार्गावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच सुरक्षादलातील जवानांच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठं पाऊल उचललं होते. जवानांच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मीर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर आठवड्यातून दोन दिवस सामान्य लोकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनंतर जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच महामार्गावर प्रत्येक ठिकाणी जवानांसह पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

यावर्षी 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर हायवेवर पुलवामा हल्ला झाला होता. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. तेव्हापासून राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *