भारतीय सीमेवर हाय अलर्ट, काश्मीर,पंजाब, उत्तराखंडची विमानसेवा बंद

जम्मू-काश्मीर : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. वायूसेनेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार करत शस्त्रसंधींचं उल्लंघन केले जात आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून LoC वर गोळीबारच्या दरम्यान पाकिस्तानी लढाऊ विमानाने भारतीय वायुसीमाचे उल्लंघन केले आहे आणि सीमापार करत दोन विमानांनी भारतात प्रवेश केला. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे जम्मू-काश्मीर विमानतळ बंद […]

भारतीय सीमेवर हाय अलर्ट, काश्मीर,पंजाब, उत्तराखंडची विमानसेवा बंद
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

जम्मू-काश्मीर : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. वायूसेनेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार करत शस्त्रसंधींचं उल्लंघन केले जात आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून LoC वर गोळीबारच्या दरम्यान पाकिस्तानी लढाऊ विमानाने भारतीय वायुसीमाचे उल्लंघन केले आहे आणि सीमापार करत दोन विमानांनी भारतात प्रवेश केला. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे जम्मू-काश्मीर विमानतळ बंद करण्यात आले आहे.

लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट एअरपोर्टवर हाय अलर्टचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे येथील एअरस्पेस बंद करण्यात आले आहेत. अनेक व्यावसायिक विमानं रोखण्यात आली आहे. भारतीय एअरपोर्ट प्राधिकरणच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरशिवाय पंजाबमधील अमृतसर एअरपोर्टही बंद करण्यात आलं आहे.

पाकिस्तान जेट फायटर विमानाने भारतीय वायूसीमेचे उल्लंघन करत लाईन ऑफ कंट्रोल (एलओस) जवळ चार ठिकाणी बॉम्ब टाकण्याचाही प्रयत्न केला. भारतीय वायूसेनेच्या एअरस्ट्राईकमुळे श्रीनगर एअरपोर्ट येथील व्यावसायिक उडानं बंद करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांसाठी पुढील 3 तास रन-वे बंद ठेवण्यात येणार आहे.

देशातील विमानतळं आणि शहरांमध्ये हायअलर्ट

खबरदारीचा उपाय म्हणून देशातील काही विमानतळे आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. राजस्थानमधील जैसलमेर हे पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेलं शहर आहे. या शहरातील गावं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय गुजरातमधील पूँछमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पाकिस्तानचं विमान पाडलं

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या भारतीय वायूसेनेने वेळीच उत्तर दिलं आणि हा प्रयत्न हाणून पाडला. विशेष म्हणजे भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं सर्वात महत्त्वाचं असलेलं F-16 हे विमान पाडल्याची माहिती आहे. हे विमान पडत असताना पायलट पॅराशूटच्या माध्यमातून उडी फेकत असल्याचंही दिसून आलंय.

व्हिडीओ : पाकचं विमान दिसता क्षणी पाडा, हवाई दलाला आदेश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.