13 वर्षीय मुलीच्या पोटात अर्धा किलो केसांचा बुचका

तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये 13 वर्षीय मुलीच्या पोटातून चक्क अर्धा किलो केस आणि शॅम्पूचे रिकामे पाऊच (Half kg hairs in girl stomach) काढण्यात आले.

Half kg hairs in girl stomach, 13 वर्षीय मुलीच्या पोटात अर्धा किलो केसांचा बुचका

चेन्नई : तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये 13 वर्षीय मुलीच्या पोटातून चक्क अर्धा किलो केस आणि शॅम्पूचे रिकामे पाऊच (Half kg hairs in girl stomach) काढण्यात आले. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले. मुलीच्या पोटात सतत दुखत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल (Half kg hairs in girl stomach) केले.

कोईम्बतूरच्या व्हीजेएम रुग्णालयात जेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या पोटाचा एक्सरे काढला असता तिच्या पोटात चेंडू सारखी वस्तू असल्याचे दिसले. त्यामुळे तिच्या पोटात दुखत होते. यानंतर डॉक्टरांनी अँडोस्कोपीद्वारे पोटातील ती वस्तू बाहेर काढण्याचे ठरवले, पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

अँडोस्कोपीमध्ये अपयश आल्याने रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर शस्त्रक्रिया करत पोटातील वस्तू बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. जेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण तिच्या पोटात चेंडू आहे असा डॉक्टरांचा समज होता. पण तिच्या पोटातून केसांचा बुचका निघाला. या केसांचे वजन अर्धा किलो होते.

त्याशिवाय, मुलीच्या पोटातून शॅम्पूचे खाली पाऊचही मिळाले. “मुलीच्या जवळील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ती केस आणि शॅम्पूचे पाऊच खात होती. जे सर्व पोटात जमा झाले होते”, असं डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, मुलीच्या तब्येतीत सुधारणा झाली असून ती लवकर बरी होईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *