खासगी बस 500 फूट दरीत कोसळली, 43 प्रवाशांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळ कुलूमध्ये एक खासगी बस 500 फूट दरीत कोसळून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.

खासगी बस 500 फूट दरीत कोसळली, 43 प्रवाशांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळ कुलूमध्ये एक खासगी बस 500 फूट दरीत कोसळून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. आज (20 जून) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या खासगी बसमध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त प्रवाशी होते. तर काही प्रवाशी बसच्या छतावरही बसले होते. ही बस कुलूजवळी बंजारच्या भेउटजवळच्या घाटातून गाडागुशैणी याठिकाणी जात असताना हा अपघात घडला. यावेळी भेउट घाटातील धोकादायक वळणावर बस 500 फूट दरीत कोसळली. यात जवळपास 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान या ठिकाणी पोलीस, प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तसेच स्थानिक लोक पाठीवर बसवून जखमींना दरीतून वर काढत आहेत. आतापर्यंत बसमधील काही जखमींना दरीतून वर काढण्यात आले आहे. या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *