सावरकर जयंती निमित्त हिंदू महासभेकडून दहावी-बारावीच्या मुलांना चाकू वाटप

आग्रा (उत्तर प्रदेश) : अखिल भारत हिंदू महासभेतर्फे विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना चाकू वाटप करण्यात आले. अल्पवयीन मुलांना चाकू वाटून हिंदू महासभेने सावरकरांची जयंती साजरी केली. यावेळी राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडेही उपस्थित होती. यापूर्वी 30 जानेवारी रोजी पूजा पांडेवर महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल …

सावरकर जयंती निमित्त हिंदू महासभेकडून दहावी-बारावीच्या मुलांना चाकू वाटप

आग्रा (उत्तर प्रदेश) : अखिल भारत हिंदू महासभेतर्फे विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना चाकू वाटप करण्यात आले. अल्पवयीन मुलांना चाकू वाटून हिंदू महासभेने सावरकरांची जयंती साजरी केली. यावेळी राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडेही उपस्थित होती.

यापूर्वी 30 जानेवारी रोजी पूजा पांडेवर महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

“सावरकर यांचे स्वप्न होते, राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूचे सैनिकीकरण झाले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विजय मिळवत मोदींनी सावरकरांचे पहिले स्वप्न पूर्ण केले आहे. आता चाकू वाटून आणि हिंदू सैनिक तयार करुन आम्ही दुसरे स्वप्न पूर्ण करणार आहे”, असं हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे म्हणाले.

पांडे म्हणाले, “जर हिंदूंना स्वत:चे आणि आपल्या देशाचे संरक्षण करायचे आहे. तर त्यांना हत्यार चालवणे शिकावे लागेल”.

ज्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळालेले आहेत. त्यांना भगवत गीतेसोबत चाकूही वाटण्यात आले. यामागे एकच उद्देश आहे की, मुलांना कळावे की , हत्याराचा वापर कधी आणि केव्हा केला पाहिजे. मुलांनी आपल्या बहीण आणि मुलींच्या संरक्षणासाठी कणखर बना, असं पूजा पांडे म्हणाली.

“हिंदूना प्रोस्ताहित आणि सशक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. विशेष म्हणजे तरुण पीढीसाठी हे महत्त्वाचे आहे. कारण ते स्वत:च संरक्षण करु शकतील”, असं महासभा राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे म्हणाले.

हिंदू महासभेच्या या कृत्यामुळे देशभरातील अनेक सामाजिक संघटनेकडून पूजा पांडे आणि हिंदू महासभेचा निषेध केला आहे. यापूर्वीही महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे पूजा पांडे अडचणीत सापडली होती. पण पुन्हा एकदा चाकू वाटून पूजा पांडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *