रायबरेलीचा इतिहास : जेव्हा पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधींचा पराभव झाला होता..

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला. पाचव्यांदा रायबरेलीतून निवडणूक लढत असलेल्या सोनिया गांधींनी यावेळी अब की बार पाच लाख पार असा नारा दिलाय. 2014 च्या निवडणुकीत सोनिया गांधींना 5.26 लाख मतं मिळाली […]

रायबरेलीचा इतिहास : जेव्हा पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधींचा पराभव झाला होता..
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला. पाचव्यांदा रायबरेलीतून निवडणूक लढत असलेल्या सोनिया गांधींनी यावेळी अब की बार पाच लाख पार असा नारा दिलाय. 2014 च्या निवडणुकीत सोनिया गांधींना 5.26 लाख मतं मिळाली होती. सपा आणि बसपाने या मतदारसंघातून उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे प्रमुख लढत ही भाजपसोबतच असेल.

विधानसभा मतदारसंघांचं समीकरण

रायबरेलीतील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी दोन जागा काँग्रेसकडे आहेत. तर भाजपकडेही दोनच जागा आहेत. रायबरेलीत काँग्रेसचं वर्चस्व आहे, तर हरचंदपूर मतदारसंघात भाजपचा थोडक्यात पराभव झाला होता. बछरावा आणि सारेनीमध्ये भाजपचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीतील आकड्यांकडे पाहत भाजपने इथे काँग्रेसविरोधात रणनीती आखली आहे. अमेठीत भाजपच्या स्मृती इरामी यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आव्हान दिलंय. पण रायबरेलीत भाजपची तेवढी आक्रमकता दिसून येत नाही.

फिरोज खान यांनी खातं उघडलं, आतापर्यंत तीन पराभव

रायबरेली हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथे 1957 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती फिरोज खान यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. आतापर्यंत काँग्रेसला इथे फक्त तीन वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. आणीबाणीनंतर झालेल्या 1977 च्या निवडणुकीत जनता पार्टीचे राज नारायण आणि नंतर 1996 आणि 1998 च्या निवडणुकीत आरपी सिंह यांनी काँग्रेसला हरवलं होतं. हे अपवाद वगळता आतापर्यंत काँग्रेसने या मतदारसंघावर वर्चस्व राखलं आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कन्या इंदिरा गांधी 1967 साली निवडणुकीत उतरल्या. 1967 नंतर त्यांनी या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवला आणि देशाची पहिली महिला पंतप्रधानही देशाला रायबरेलीतूनच मिळाली.

देशाच्या पंतप्रधानाचा पराभव झाला तेव्हा…

1977 मध्ये भारतीय लोक पक्षाचे उमेदवार राज नारायण यांच्याविरोधात इंदिरा गांधींचा पराभव झाला. पंतप्रधानपदावर असताना पराभव होण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. यानंतर तीन वर्षात निवडणुका झाल्या आणि 1980 ला इंदिरा गांधी विक्रमी मतांनी विजयी झाल्या. 1984 आणि 1989 मध्ये जवाहरलाल नेहरु यांचे पुतणे अरुण कुमार नेहरु यांनी रायबरेलीतून विजय मिळवला. 1989 आणि 1991 मध्ये शीला कौल काँग्रेसच्या खासदार झाल्या. 1996 आणि 1998 मध्ये पहिल्यांदाच इथे अशोक सिंह यांच्या रुपाने भाजपचं कमळ फुललं. पण यानंतर आतापर्यंत काँग्रेसला रायबरेलीत कुणीही हरवू शकलेलं नाही.

2004 मध्ये सोनिया गांधींची रायबरेलीत एंट्री

सोनिया गांधींची रायबरेलीत एंट्री 2004 मध्ये होते. यापूर्वी त्या पती राजीव गांधी यांचा मतदारसंघ अमेठीतून लढत होत्या. मुलगा राहुल गांधींसाठी त्यांनी अमेठीची जागा सोडली आणि रायबरेलीत एंट्री केली. मोदी लाटेतही सोनिया गांधींचा तब्बल 3.5 लाख मतांच्या फरकाने विजय झाला.

रायबरेलीत भाजप कमकुवत स्थितीत

भाजपने अमेठीत राहुल गांधींना घेरलं असलं तरी रायबरेलीत मात्र भाजप फार सक्रिय दिसत नाही. सोनिया गांधी निवडणूक लढणार नसल्याचंही बोललं जात होतं. पण अखेर त्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. गेल्या वर्षी भाजपात आलेले काँग्रेसचे दिग्गज नेते दिनेश प्रताप सिंह यांना भाजपने रायबरेलीतून तिकीट दिलंय. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढतीत काय होतं याचा निकाल 6 मे रोजी मतदान झाल्यानंतर 23 मे रोजी येणार आहे.

Non Stop LIVE Update
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.