गृहमंत्रालयाकडून जम्मू काश्मीरमधील 10 दहशतवाद्यांची नावे जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांची यादी जाहीर केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यात 10 दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहमंत्रालयाने एक महत्त्वाची बैठकही बोलावली आहे. या यादीत रियाज नायकू, मोहम्मद अशरफ, मेहराजुद्दीन, हिजबुल सैफुल्ला, अशारदुल हक, वसीम अहमद, आयझाज मलिक या नावांचाही समावेश आहे. हे …

गृहमंत्रालयाकडून जम्मू काश्मीरमधील 10 दहशतवाद्यांची नावे जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांची यादी जाहीर केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यात 10 दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहमंत्रालयाने एक महत्त्वाची बैठकही बोलावली आहे.

या यादीत रियाज नायकू, मोहम्मद अशरफ, मेहराजुद्दीन, हिजबुल सैफुल्ला, अशारदुल हक, वसीम अहमद, आयझाज मलिक या नावांचाही समावेश आहे. हे सर्व दहशवादी वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत. त्यांच्या मागील काळातील कारवायांच्या आधारे ही यादी बनवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी दहशतवाद्यांकडून वारंवार प्रयत्न होत आहेत. अशा स्थितीत सैन्याने देखील ऑपरेशन ऑल आऊट सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून ही यादी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाने एक महत्त्वाची बैठक बोलावली असून त्यात या दहशवाद्यांचा खात्मा कसा करायचा याची रणनिती निश्चित केली जाईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *