निमलष्करी दलात आता तृतीयपंथीही दिसणार, BSF कडून हिरवा कंदील

यावर्षी तृतीयपंथी व्यक्तींना केडर असिस्टंट कमांडर पदावर भर्ती (Hire Transgender in CRPF) करु

निमलष्करी दलात आता तृतीयपंथीही दिसणार, BSF कडून हिरवा कंदील

नवी दिल्ली : यावर्षी तृतीयपंथी व्यक्तींना केडर असिस्टंट कमांडर पदावर भरती (Hire Transgender in CRPF) करु, असं सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF) आणि सशस्त्र सीमा दलाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितले. तृतीयपंथी व्यक्तींना समाजात स्थान मिळावे म्हणून गेल्यावर्षी तृतीयपंथीयांच्या सुरक्षेचा कायदा (ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन अॅक्ट) पारित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बीएसएफ, सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी गृह मंत्रालयाला तृतीयपंथीयांच्या भरतीबद्दल गृह मंत्रालयाला (Hire Transgender in CRPF) सांगितले.

“सीआरपीएफमध्ये पहिल्यापासून जेंडर न्यूट्रल वर्क (लिंगभेद टाळून) वातावरण आहे. आम्ही एमएचएच्या (गृहमंत्रालय) गाईडलाईन्स आमच्या गरजेनुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो”, असं डायरेक्टर जनरल एपी महेश्वरी यांनी सांगितले.

“तृतीयपंथीयांच्या भरतीबाबत आम्हाला काही अडचण नाही. याबाबत आम्ही निमलष्करी दलासोबत बोलू”, असं बीएसएफचे डायरेक्टर जनरल एस.एस. देसवाल यांनी सांगितले.

“येणाऱ्या काही दिवसात आम्ही तृतीयपंथीयांच्या भरतीबाबतच्या अधिकृत माहितीवर बोलू”, असं आयटीबीपी आणि सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी दलाने सांगितले.

केंद्रीय निमलष्करी दलाच्या सूचना केंद्रीय लोकसेवा आयोगाला कळवल्या जातील. त्यानुसार ही परीक्षा घेतली जाईल

“डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीच्या अर्जात तृतीयपंथींयांसाठी वेगळी कॅटिगरी ठेवू. या प्रकरणात केंद्रीय निमलष्करी दलाच्या सूचना केंद्रीय लोकसेवा आयोगाला कळवल्या जातील. त्यानुसार ही परीक्षा घेतली जाईल”, असं गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलाला सांगितले.

डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगने एप्रिलमध्ये सर्व केंद्रीय सरकारी विभागांना नोटीस जारी करत म्हटले की, “सरकारी नोकरीच्या रिक्त जागेसाठी तृतीयपंथीयांसाठी कॅटेगरी असावी. ज्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसचाही समावेश असावा.”

“आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. तसेच तृतीयपंथीयांसाठी सर्व सरकारी नोकरीमध्ये वेगळी जागा असावी. हे समाजात तृतीयपंथीयांसाठी खूप गरजेचे आहे”, असं छत्तीसगड तृतीयपंथी वेल्फेअर बोर्डाचे सदस्य विद्युत राजपूत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

सत्ता आमच्या हातात द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करु, तृतीयपंथीयाची मागणी

Lockdown : लॉकडाऊनचा तृतीयपंथीयांना फटका

निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *