चक्क स्मशानभूमीबाहेर ‘हाऊस फुल्ल’चा बोर्ड; कोरोनानं परिस्थिती चिघळली

चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर चक्क ‘हाऊस फुल्ल’चा फलक लावण्यात आलाय. या हाऊस फुल्लच्या बोर्डामुळे कोरोनानं परिस्थिती किती बिघडलीय हे लक्षात येईल. karnataka Cemetery House Full

  • विश्वनाथ येळ्ळूरकर, टीव्ही 9 मराठी, कर्नाटक
  • Published On - 0:30 AM, 4 May 2021
चक्क स्मशानभूमीबाहेर ‘हाऊस फुल्ल’चा बोर्ड; कोरोनानं परिस्थिती चिघळली
karnataka Cemetery House Full

कर्नाटक : देशात कोरोनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली असून, दररोज हजारो कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन, बेड, इतर कारणांमुळे बळी जात आहे. बंगळुरूमध्येही परिस्थिती अधिक गंभीर असून, दररोज होणाऱ्या शेकडो कोरोना मृत्यूंमुळे स्मशानभूमीबाहेर मृतदेहांच्या रांगा लागल्यात. अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना स्मशानभूमींचा शोध घ्यावा लागत असल्याचं हृदयद्रावक चित्र समोर आलंय. चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर चक्क ‘हाऊस फुल्ल’चा फलक लावण्यात आलाय. या हाऊस फुल्लच्या बोर्डामुळे कोरोनानं परिस्थिती किती बिघडलीय हे लक्षात येईल. (‘House Full’ board just outside Cemetery in karnataka; Corona sucked the situation)

स्मशानभूमीत मोठ्या संख्येनं मृतदेह आणले जात आहेत

कोरोनामुळे अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली असून, स्मशानभूमीत मोठ्या संख्येनं मृतदेह आणले जात आहेत. कर्नाटकातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या बंगळुरूतील चामराजपेटमधील स्मशानभूमीबाहेर चक्क ‘हाऊस फुल्ल’चा बोर्ड लावण्यात आलाय. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने बोर्ड लावण्यात आलाय. स्मशानभूमीत 20 पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नवीन मृतदेह घेण्यास नकार दिला जात आहे.

मृतांची संख्या वाढल्याने त्यांची क्षमता संपली

बंगळुरूमध्ये 13 अशा स्मशानभूमी आहेत, जिथे विद्युत शवदाहिन्या आहेत. मात्र, कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आणि मृतांची संख्या वाढल्याने त्यांची क्षमता संपली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने बंगळुरूजवळ असलेल्या बृहत बंगळुरू महापालिका हद्दीतील 230 एकर जागा पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आरक्षित केली आहे. शहरातील स्मशानभूमींवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारी कर्नाटकात 217 कोरोना मृत्यूची नोंद

रविवारी कर्नाटकात 217 कोरोना मृत्यूची नोंद झाली. यापैकी 64 मृत्यू हे फक्त बंगळुरू शहरातील होते. स्मशानभूमींबाहेर लागणाऱ्या रांगा लक्षात घेऊन सरकारनं स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यासही परवानगी दिली आहे. कर्नाटकातील एकूण रुग्णसंख्या रविवारी 16 लाखांवर पोहोचली. राज्यात 37 हजार 733 रुग्ण आढळून आले, तर आतापर्यंत राज्यात 16 हजार 11 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

कोरोनाशी मुकाबल्यासाठी सशस्त्र दलांकडून ‘को-जीत’ मोहीम, मराठमोळ्या माधुरी कानिटकरांकडे नेतृत्व

कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये सतत CT Scan करु नका, अन्यथा कॅन्सरचा धोका : AIIMS

‘House Full’ board just outside Cemetery in karnataka; Corona sucked the situation