बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरमध्ये 'एवढे' दिवस बँका बंद; जाणून घ्या...

देशाच्या विविध भागातील बँका नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, छठपूजेसह विविध सणांमुळे बंद राहणार आहेत.

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरमध्ये 'एवढे' दिवस बँका बंद; जाणून घ्या...

नवी दिल्लीः आपली बँकेची कामे प्रलंबित असतील, तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण नोव्हेंबरमध्ये सुट्टीच्या निमित्तानं बरेच दिवस बँका बंद राहणार आहेत. देशाच्या विविध भागातील बँका नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, छठपूजेसह विविध सणांमुळे बंद राहणार आहेत. (Banks Closed November Bank Holidays )

राज्यांनुसार बँकेच्या सुट्टीमध्ये बदल केला जाऊ शकतो. पण काही सार्वजनिक सुट्ट्या आहेत, ज्यामध्ये देशभरातील बँका बंदच राहतील. सणासुदीच्या काळात बँका बरेच दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असल्याने बँकांमधील कामकाज ठप्प असणार आहे. जर आपण नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम मार्गी लावण्याचा विचार करीत असाल तर पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या तारखेला बँका राहणार बंद

1 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.
8 नोव्हेंबर रविवार असल्याने बँकांना सर्व राज्यांमध्ये सुट्टी असेल.
14 नोव्हेंबरला दिवाळी अमावस्या, काली पूजानिमित्त सुट्टी असेल
15 नोव्हेंबरपासून सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.
16 नोव्हेंबर दिवाळी, लक्ष्मी पूजा, ब्रदरहुड, चित्रगुप्त जयंती, नवीन वर्षाचा दिवस म्हणून सुट्टी देण्यात आली आहे.
20 नोव्हेंबर छठ पूजेनिमित्त सुट्टी (पाटणा आणि रांची, बिहारची राजधानी) असेल
21 नोव्हेंबर छठ पूजेनिमित्त सुट्टी (पाटणा, बिहारची राजधानी) असेल
22 नोव्हेंबर असल्याने बँकांना सर्व राज्यांमध्ये सुट्टी असेल.
28 नोव्हेंबर महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँकांना या दिवशी सुट्टी असेल.
29 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.
30 नोव्हेंबर गुरुनानक जयंती / कार्तिक पौर्णिमेनिमित्त सुट्टी असेल.

अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर येथे 16 नोव्हेंबर रोजी बँका बंद राहतील. तर 30 नोव्हेंबर रोजी बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद असतील.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

गॅस सिलिंडरपासून बँक शुल्कापर्यंत 7 महत्त्वाचे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलणार; आपल्या खिशावर थेट परिणाम

आता मिळणार कॅशबॅक! ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *