पती सतत UPSC च्या अभ्यासात व्यस्त, पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

सततच्या अभ्यासाला वैतागून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केलाय. पतीच्या अभ्यासाला (husband busy for UPSC) वैतागलेली पत्नी लग्नानंतर माहेरी निघून गेली, जी तीन महिन्यांपासून माहेरातच राहत आहे.

पती सतत UPSC च्या अभ्यासात व्यस्त, पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

भोपाळ : लग्नानंतरही अभ्यास करुन यूपीएससी किंवा राज्यसेवा पास केल्याचे अनेक उदाहरणं आपण ऐकतो. भोपाळमध्येही एक तरुण लग्नानंतरही यूपीएससीचा (husband busy for UPSC) अभ्यास करत होता. पण त्याच्या या सततच्या अभ्यासाला वैतागून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केलाय. पतीच्या अभ्यासाला (husband busy for UPSC) वैतागलेली पत्नी लग्नानंतर माहेरी निघून गेली, जी तीन महिन्यांपासून माहेरातच राहत आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे समुपदेशनासाठी हे प्रकरण वर्ग करण्यात आलं आहे. सल्लागार नुरननिसा यांनी याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली. आमच्याकडून एका नवदाम्पत्याचं समुपदेशन केलं जात आहे. कोर्टाने लग्न वाचवण्यासाठी हे प्रकरण समुपदेशनासाठी आमच्याकडे सोपवलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित तरुणी ही मूळची महाराष्ट्रातील आहे. 2018 मध्ये तिचा विवाह झाला आणि ती फक्त तीन महिने पतीसोबत राहिली. पती अभ्यासात एवढा गुंतलेला होता, की त्याला पत्नी सोबत असल्याची जाणिवही होत नसल्याचं सांगण्यात येतंय. यानंतर वैतागलेल्या पत्नीने थेट माहेर गाठलं.

पती सतत यूपीएससी आणि राज्यसेवेची तयारी करत होता, ज्यामुळे माझ्यावर दुर्लक्ष झालेलं मी पाहू शकत नव्हते, असं संबंधित तरुणीने सांगितलंय. संबंधित पती पीएचडी धारक असून कोचिंग क्लासही चालवतो. हा पती आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. पण आई-वडिलांपैकी एक जण आजारी असल्यामुळे त्याने लवकर लग्न केलं. पण लग्नानंतर तीन महिन्यातच पत्नीने माहेरी जाणंच पसंत केलं.

लग्नानंतर तीन महिन्यातच पत्नी माहेरी गेली आणि ती परत यायला तयार नसल्यामुळे तेव्हापासून कोणताही संपर्क नव्हता, असं पतीने समुपदेशनावेळी सांगितलं. नातेवाईकांकडून केलेली मध्यस्थीही कामी न आल्यानंतर अखेर घटस्फोटासाठी अर्ज दाखल करावा लागला. प्रकरण कोर्टासमोर सुनावणीला जाण्यापूर्वी चार सत्रांमध्ये समुपदेशन करण्यात येईल, ज्यामुळे लग्न वाचवता येण्यासाठी फायदा होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *