"सावरकरांच्या 'भारतरत्न'ला नेहमीच विरोध करत राहणार"

खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी म्हणजे गांधीजींच्या विचारांची हत्या असल्याचं म्हटलं आहे.

"सावरकरांच्या 'भारतरत्न'ला नेहमीच विरोध करत राहणार"

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार (Husain Dalwai opposes Savarkar Bharat Ratna) देण्याची मागणी करणे म्हणजे महात्मा गांधी यांच्या विचारांची हत्या करणे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई (Husain Dalwai opposes Savarkar Bharat Ratna) यांनी दिली. शिवसेनेने सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या पत्रकार परिषदेत या मागणीचा पुनरुच्चार केला. भाजपच्याही अनेक नेत्यांची ही मागणी आहे. भाजपच्या निवडणूक संकल्पपत्रातही सावरकरांना भारतरत्न देण्याचा उल्लेख आहे.

भाजप-शिवसेनेच्या या मागणीवर काँग्रेसचा आक्षेप आहे. खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी म्हणजे गांधीजींच्या विचारांची हत्या असल्याचं म्हटलं आहे.

हुसेन दलवाई म्हणाले, “सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी विरोध कायम असेल. वेळ पडल्यास सभागृहामध्ये माझा विरोधही दर्शवेन. त्यांना भारतरत्न देणे म्हणजे गांधीजींच्या विचारांची हत्या आहे”

सावरकरांविषयी अनेक राजकीय नेत्यांनी आपली भूमिका त्यांच्याविरोधात मांडली असताना, सरकार मात्र त्यांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न करत आहे, हे सरकार सावरकर विचारांचं सरकार आहे, असंही हुसेन दलवई म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय?

एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:ही अनेकवेळा सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. असं असताना आता महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचं ठरवलं आहे. शिवसेना नेहमीच हिंदुत्वाचा मुद्दा अग्रस्थानी घेऊन राजकारण करत आली आहे. मात्र आता सेनेचा हा मुद्दा काँग्रेस-राष्ट्रवादीला किती रुचतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *