50 कोटी दिले तर मोदींनाही मारेन, जवान तेजबहादूरचा कथित व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : बीएसएफचा निलंबित जवान तेजबहादूर यादव एका व्हिडीओ क्लिपमुळे चर्चेत आलाय. मला 50 कोटी रुपये दिले तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मारु शकतो, असं या व्हिडीओ क्लिपमध्ये तो बोलताना दिसतोय. हा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय. टीव्ही 9 मराठीने या व्हिडीओची पुष्टी केलेली नाही. एकीकडे या व्हिडीओमध्ये बोलणारा व्यक्ती तेजबहादूरच असल्याचा दावा …

50 कोटी दिले तर मोदींनाही मारेन, जवान तेजबहादूरचा कथित व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : बीएसएफचा निलंबित जवान तेजबहादूर यादव एका व्हिडीओ क्लिपमुळे चर्चेत आलाय. मला 50 कोटी रुपये दिले तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मारु शकतो, असं या व्हिडीओ क्लिपमध्ये तो बोलताना दिसतोय. हा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय. टीव्ही 9 मराठीने या व्हिडीओची पुष्टी केलेली नाही.

एकीकडे या व्हिडीओमध्ये बोलणारा व्यक्ती तेजबहादूरच असल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे हे षडयंत्र असल्याचाही आरोप होतोय. मित्रांसोबत गप्पा मारताना थेट पंतप्रधानांना मारण्याच्या गप्पा केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय.

खराब जेवणाची तक्रार केल्यामुळे बीएसएफमधून निलंबित केल्याचा आरोप तेजबहादूरने केला होता. शिवाय त्याने वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढण्याची घोषणाही केली. सपा आणि बसपाने तेजबहादूरला उमेदवारी दिली होती. पण तेजबहादूरचा अर्ज अवैध ठरला.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *