KBC च्या नावे IAS ऑफिसरच्या आईला गंडा, 25 लाखांच्या बक्षिसाचं आमिष

'कौन बनेगा करोडपती' गेम शोमध्ये 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळाल्याचं आमिष दाखवत उत्तर प्रदेशातील महिलेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर सेल पोलिस अधिक तपास करत आहेत.

KBC च्या नावे IAS ऑफिसरच्या आईला गंडा, 25 लाखांच्या बक्षिसाचं आमिष
Follow us
| Updated on: Aug 05, 2019 | 8:38 AM

लखनौ : अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शोच्या नावाखाली सर्वसामान्यांची लुबाडणूक होण्याचं सत्र सुरुच आहे. 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळाल्याचं आमिष दाखवत उत्तर प्रदेशातील महिलेची फसवणूक करण्यात आली. लखनौमधील आयएएस ऑफिसरच्या आईकडून 16 हजार रुपये उकळण्यात आले.

आग्य्रातील बल्केश्वरमध्ये राहणाऱ्या पुष्पादेवी यांचे पुत्र संजय गर्ग केरळमध्ये आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी पुष्पा देवी यांना आपण ‘कौन बनेगा करोडपती’च्या टीममधून बोलत असल्याचा दावा करणारा फोन आला.

‘मी कौन बनेगा करोडपतीमधून अमिताभ बच्चन यांचा प्रतिनिधी बोलत आहे. वेगवेगळ्या शहरांतून आम्ही स्पर्धक शोधत आहोत. केबीसीमध्ये आपली निवड झाली आहे. तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. मात्र चेक घेण्यासाठी तुम्हाला 16 हजारांचा कर भरावा लागेल’ असं फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.

फोन करणाऱ्या व्यक्तीवर पुष्पा देवी यांनी विश्वास ठेवला. पैसे पाठवण्याची पद्धत सांगणारा एक व्हिडिओही आरोपीने पुष्पा देवी यांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. त्या व्हिडिओतील सूचनेनुसार पुष्पादेवी यांनी 16 हजार रुपये आरोपीच्या खात्यावर जमा केले.

तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा पुष्पा देवी यांना फोन आला. कंपनीच्या मॅनेजरला चेकवर सही करण्यासाठी आणखी 70 हजार रुपये हवे आहेत, असं यावेळी सांगण्यात आलं. पैशांची आणखी मागणी केल्यामुळे पुष्पा देवी यांना संशय आला. अखेर त्यांनी आपले पती आणि मुलाला याबाबत सांगितलं.

पतीसोबत न्यू आग्रा पोलिसात जाऊन पुष्पा देवी यांनी तक्रार दाखल केली. सायबर क्राइम सेल या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पुष्पा देवी यांच्याशिवाय आणखी कोणाला गंडा घातला आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.