दिल्लीत दोन दहशतवादी घुसल्याची माहिती, मुंबईतही कडेकोट बंदोबस्त

दिल्लीसह मुंबई आणि इतर महत्त्वाची शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. आयएसआयचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची माहिती आयबीला मिळाली आहे.

दिल्लीत दोन दहशतवादी घुसल्याची माहिती, मुंबईतही कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील दहशतवादी कटाबाबत गुप्तचर यंत्रणेला (आयबी) महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर भारतात दहशतवादी (Terrorist in Delhi) हल्ल्याच्या तयारीत आहे. दिल्लीसह मुंबई आणि इतर महत्त्वाची शहरं दहशतवाद्यांच्या (Terrorist in Delhi) निशाण्यावर आहेत. आयएसआयचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची माहिती आयबीला मिळाली आहे.

सुरक्षा यंत्रणांनी दोन्ही दहशतवाद्यांचे फोटोही जारी केले आहेत आणि तपास सुरु केला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह गर्दीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीत पोलीस उपायुक्त स्वतः सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करुन आढावा घेत आहेत.

मुंबई आणि गुजरातला धोका

मुंबईतील सर्व गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दोन संशयितांचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. स्थानकातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे.

गुजरातच्या कांडला बंदरावर ट्रेनिंगसाठी एका दहशतवाद्याला पाठवण्यात आल्याचीही माहिती हाती लागली आहे. यानंतर कांडला बंदरावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना वेग

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 मधील काही तरतुदी रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागूनही कुणी प्रतिसाद न दिल्याने पाकिस्तानचा संताप झालाय. यानंतर पाकिस्तानची दहशतवादी पोसणारी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी प्रयत्न सुरु केला. पण भारतीय गुप्तचर यंत्रणांनी योग्य वेळी योग्य माहिती काढत हा प्रयत्न हाणून पाडला. काश्मीर घाटीमध्येही दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न यापूर्वी हाणून पाडला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *