सैन्य पुन्हा टार्गेट, पुलवामात पुन्हा IED स्फोट, स्फोटाने भला मोठा खड्डा

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पुलवामात (Pulwama attack) 14 फेब्रुवारीला झालेल्या IED स्फोटाच्या जखमा ताज्या असतानाच आज पुन्हा एका पुलवामा आयईडी स्फोटाने हादरलं. पहाटे तीनच्या सुमारास पुलवामातील त्राल भागात भररस्त्यात आयईडी स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, ज्या रस्त्यावर हा स्फोट घडवण्यात आला त्या रस्त्यावर एक भला मोठा खड्डा पडला आहे. या मार्गावरुन भारतीय सैन्य […]

सैन्य पुन्हा टार्गेट, पुलवामात पुन्हा IED स्फोट, स्फोटाने भला मोठा खड्डा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पुलवामात (Pulwama attack) 14 फेब्रुवारीला झालेल्या IED स्फोटाच्या जखमा ताज्या असतानाच आज पुन्हा एका पुलवामा आयईडी स्फोटाने हादरलं. पहाटे तीनच्या सुमारास पुलवामातील त्राल भागात भररस्त्यात आयईडी स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, ज्या रस्त्यावर हा स्फोट घडवण्यात आला त्या रस्त्यावर एक भला मोठा खड्डा पडला आहे. या मार्गावरुन भारतीय सैन्य जाणार होतं का, याबाबतची माहिती मिळालेली नाही. मात्र सुदैवाने कोणताही जवाना या मार्गावरुन न गेल्याने मोठी हानी टळली. या स्फोटात पुलवामातील एक नागरिक जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा – पाकमध्ये ‘भारतीय’ समजून ज्याला मारहाण झाली, त्या पाकिस्तानी पायलटचा मृत्यू

भारतीय सैन्याला टार्गेट करुनच हा आईडी स्फोट घडवण्याचा कट रचल्याची शक्यता आहे. मात्र हा स्फोट वेळेआधीच फुटल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र दहशतवाद्यांचा हा क्रूर डाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, 14 फेब्रुवारीला पुलवामात जो आईडी स्फोट झाला होता, त्या स्फोटात भारताचे तब्बल 40 जवान शहीद झाले होते. मात्र जर आज या मार्गावरुन सैन्य गेलं असतं तर पुलवामाच्या त्या हल्ल्याची पुनरावृत्ती झाली असती.

दिल्लीत पोहोचताच विंग कमांडर अभिनंदन ताबिशला कडकडून भेटले!

पुलवामा हल्ला :

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar)  नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात बुलडाण्याच्या दोन वीरांनाही वीरमरण आलं.

पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?

त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली होती. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.

40 जवानांचा जीव घेणाऱ्या 21 वर्षीय दहशतवाद्याचे आई-बाप काय म्हणतात? 

भारताकडून पुलवामा हल्ल्याचा बदला

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद (Jaish E Mohammed) या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिलं. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने PoK मध्ये एअर स्ट्राईक केली. भारतीय वायुसेनेने बालाकोटच्या जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणावर हा हल्ला केला. या हल्ल्यात 300 ते 400 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

40 जवानांचा जीव घेणाऱ्या 21 वर्षीय दहशतवाद्याचे आई-बाप काय म्हणतात? 

पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?  

विंग कमांडर अभिनंदन यांचं BCCI कडून हटके स्वागत  

प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द – Welcome Home Abhinandan  

भारतात येण्यापूर्वी अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत, छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर  

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.