भाजपच्या विजयाला राहुल गांधीच जबाबदार असतील : केजरीवाल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सपा-बसपा, केरळमध्ये डावे पक्ष, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि दिल्लीत आपला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामुळे नुकसान होणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर त्याला राहुल गांधीच जबाबदार असतील, असा आरोप त्यांनी केला. 12 मे रोजी दिल्लीतील सात जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी …

Arvind kajriwal, भाजपच्या विजयाला राहुल गांधीच जबाबदार असतील : केजरीवाल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सपा-बसपा, केरळमध्ये डावे पक्ष, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि दिल्लीत आपला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामुळे नुकसान होणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर त्याला राहुल गांधीच जबाबदार असतील, असा आरोप त्यांनी केला. 12 मे रोजी दिल्लीतील सात जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी केजरीवालांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस आणि आपच्या आघाडीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. पण जागा वाटपावरुन चर्चा फिसकटली.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केजरीवालांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेस उत्तर प्रदेशात सपा-बसपा, केरळमध्ये डावे पक्ष, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, आंध्र प्रदेशात टीडीपी आणि दिल्लीत आपला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.  काँग्रेस भाजपविरोधात नव्हे, तर विरोधी पक्षांच्या विरोधातच निवडणूक लढत असल्याचं दिसतं. मोदींची वापसी झाली तर त्याला राहुल गांधीच जबाबदार असतील, असं केजरीवाल म्हणाले.

मोदी प्रत्येक क्षेत्रात ठोस कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत, ज्यामुळे ते बनावट राष्ट्रवादाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढत आहेत. मोदींचा राष्ट्रवाद बनावट आणि देशासाठी घातक आहे. मतं मिळवण्यासाठी ते सैन्याचा वापर करत आहेत. कारण, त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही, असं केजरीवाल म्हणाले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत मिळून यूपीए सरकारच्या दुसऱ्या काळात 2011 ते 2013 या काळात केजरीवालांनीही सक्रियपणे आंदोलन केलं होतं. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे मोदींपेक्षा कित्येक पटीने चांगले होते, असं केजरीवाल म्हणाले. मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना पुन्हा सत्तेत येऊ न देणं हे आमचं एकमेव लक्ष्य आहे. या दोघांव्यतिरिक्त आम्ही कुणाचंही समर्थन करु, असं म्हणत आप दिल्लीत चांगली मतं मिळवणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला.

एका महिन्यापूर्वी वाटत होतं की सामना अत्यंत अटीतटीचा होणार आहे. पण गेल्या 10 दिवसांमध्ये नाटकीय पद्धतीने वातावरण बदललंय. सध्या 2015 ची परिस्थिती आहे, जेव्हा आपने 67 जागा जिंकल्या होत्या. आम्ही सातच्या सात जागा जिंकलो तरी मला आश्चर्य वाटणार नाही. भाजप मोदींच्या नावावर मतं मागत आहे, पण तुम्हाला शिक्षण, आरोग्य, पाणी आणि कमी दरात वीज हे देऊ शकत नाहीत. मी चांगल्या शाळा तयार केल्या, रुग्णालये बांधली, वीज दर कमी केले, पिण्याचं पाणी सुनिश्चित केलं. ते प्रत्येक क्षेत्रात अपटशी ठरले आहेत, त्यांनी काहीही केलं नाही, असं म्हणत केजरीवालांनी भाजपवर हल्लाबोल केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *