देशावर आणखी एक संकट, सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पाऊस, IMD कडून चक्रीवादळाचा अलर्ट जारी

IMD Cyclone Alert: गेल्या काही महिन्यांपासून देशातील जनतेला झोडपून काढले आहे. हिवाळा सुरु झाला तरीही पावसाचे संकट मात्र टळलेले नाही. मोंथा चक्रीवादळानंतर आता देशाच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

देशावर आणखी एक संकट, सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पाऊस, IMD कडून चक्रीवादळाचा अलर्ट जारी
cyclone alert in andaman
| Updated on: Nov 03, 2025 | 10:16 PM

गेल्या काही महिन्यांपासून देशातील जनतेला झोडपून काढले आहे. हिवाळा सुरु झाला तरीही पावसाचे संकट मात्र टळलेले नाही. मोंथा चक्रीवादळानंतर आता देशाच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे आता हवामान विभागाने अंदमान आणि निकोबार बेटांसाठी अलर्ट जारी केला आहे. या भागात 4 नोव्हेंबरपासून चक्रीवादळाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अंदमानला चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, 2नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर आणि म्यानमार किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास सुरुवात झाली आहे. हे चक्रीवादळ समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटरपर्यंत पसरले आहे. आता येत्या 48 तासांत ते म्यानमार-बांगलादेश किनाऱ्यावर उत्तरेकडे आणि नंतर वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा फटका हजारो नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.

55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार

या वादळामुळे उत्तर अंदमान समुद्रात ताशी 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच 4 नोव्हेंबरनंतर हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांसाठी धोका निर्माण झाला आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता अंदमानच्या स्थानिक प्रशासनाने मच्छिमारांना उत्तर अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या पाण्यात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा इशारा दिला आहे. बोट चालक, बेटवासी आणि पर्यटकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पर्यटकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकले होते. यामुळे किनाऱ्यावर ऊंच लाटा पहायला मिळत होत्या. किनारी भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेली लावली होती. यात किनारी भागात काही प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य आणि केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य की खबरदारी घेतली होती, त्यामुळे मोठे नुकसान टळले होते.