21 वर्ष बांधकाम चाललेला देशातील सर्वात मोठा पूल कसा आहे?

दिसपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रम्हपुत्रा नदीवरील बोगीबील पुलाचे उद्घाटन करणार आहेत. आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा रेल्वेपूल म्हणून याची ओळख आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिनानिमित्ताने आजपासून हा पूल सर्वसामान्यांसाठी चालू होणार आहे. या पुलामुळे आसाम ते अरुणाचल प्रदेशमधील अंतर कमी होणार असून प्रवासासाठी फक्त चार तास लागणार आहे. हा पूल बांधण्याआधी अरुणाचल प्रदेशला बसने किंवा …

21 वर्ष बांधकाम चाललेला देशातील सर्वात मोठा पूल कसा आहे?

दिसपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रम्हपुत्रा नदीवरील बोगीबील पुलाचे उद्घाटन करणार आहेत. आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा रेल्वेपूल म्हणून याची ओळख आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिनानिमित्ताने आजपासून हा पूल सर्वसामान्यांसाठी चालू होणार आहे. या पुलामुळे आसाम ते अरुणाचल प्रदेशमधील अंतर कमी होणार असून प्रवासासाठी फक्त चार तास लागणार आहे. हा पूल बांधण्याआधी अरुणाचल प्रदेशला बसने किंवा इतर वाहनांनी जाण्यासाठी 170 किलोमीटरचा मार्ग पूर्ण करावा लागत असे आणि यासाठी दहा तासांपेक्षाही अधिक वेळ लागत होता.

या नवीन पुलामुळे लोकांचा आता जास्त वेळ वाया जाणार नाही. त्यासोबतच या रेल्वेपूलाने प्रवासाची वेळही कमी केली आहे. जर दिल्लीवरुन डिब्रूगडच्या ट्रेनने प्रवास केला तर तुमच्या प्रवासात तीन तास कमी होणार आहे. पहिले डिब्रूगड पोहचण्यासाठी 37 तास लागत होते. त्यासोबतच आजूबाजूला असलेल्या शहरांना आणि गावांनाही याचा फायदा होणार आहे.

देशातील सर्वात मोठ्या रेल्वेपूलाचे वैशिष्ठ्ये

  • अटल बिहीरी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्ताने पुलाचे उद्घाटन.
  • माजी पंतप्रधान एचडी देवगौडांनी 1997मध्ये पुलाच्या कामास सुरुवात केली होती.
  • 16 वर्षापूर्वी वाजपेयी सरकार असताना कामाला सुरुवात झाली होती.
  • हा पूल बनवण्यासाठी 21 वर्षांचा अवधी लागला.
  • आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेल्वेपूल आहे.
  • बोगीबील पुलासाठी एकूण 5900 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
  • हा पूल 4.9 किलोमीटर लांबीचा आहे.
  • भारतीय इस्पात प्राधिकरणने या पुलाच्या निर्माणासाठी 35 हजार 400 टन स्टीलचा वापर केला आहे.
  • या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील अंतर कमी होऊन, चार तासांचे झाले आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *