विक्री न झालेल्या फ्लॅटच्या संख्येत वाढ, देशभरातील बिल्डर हतबल

मुंबई : मागील सहा वर्षात देशातील रिअल इस्टेट सेक्टरचा वेग कमी झाला आहे. विक्रीमध्ये वाढ होत नसल्याने तयार फ्लॅट किंवा विक्री न झालेल्या फ्लॅटच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये शेवटच्या तीन महिन्यात देशातील 27 रिअल इस्टेट कंपन्यांकडे तब्बल 1.13 लाख कोटी रुपयांचे विक्री न झालेले फ्लॅट आहेत. जे मागील वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत …

विक्री न झालेल्या फ्लॅटच्या संख्येत वाढ, देशभरातील बिल्डर हतबल

मुंबई : मागील सहा वर्षात देशातील रिअल इस्टेट सेक्टरचा वेग कमी झाला आहे. विक्रीमध्ये वाढ होत नसल्याने तयार फ्लॅट किंवा विक्री न झालेल्या फ्लॅटच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये शेवटच्या तीन महिन्यात देशातील 27 रिअल इस्टेट कंपन्यांकडे तब्बल 1.13 लाख कोटी रुपयांचे विक्री न झालेले फ्लॅट आहेत. जे मागील वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत 21 टक्क्यांनी अधिक जास्त आहेत. त्यावेळी या कंपनींजवळ 93,358 कोटी रुपयांचे फ्लॅट होते, जे विकले गेले नव्हते.

विक्री न झालेले फ्लॅट सध्या रिअल इस्टेटमध्ये डोकेदुखीचं कारण ठरत आहेत. विक्री न झालेल्या फ्लॅटची संख्या चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यामध्येच आधीच्या 32 महिन्यांच्या संख्येइतकी आहे, अशी रिअल इस्टेटमधील आकडेवारी सांगते. विक्री न झालेल्या फ्लॅटचा हा आकडा मागच्या 10 वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. विक्री न झालेल्या घरांमुळे रिअल इस्टेट सेक्टरमध्ये सध्या मोठ्या संकाटांचा सामना करावा लागत आहे.

IL&FS घटनेमुळे संकटात वाढ

सतत तोट्याचा सामना करणाऱ्या रिअल इस्टेट कंपनींला पैसे मिळवण्याचे एकमेव साधन नॉन बँकिग (एनबीएफसी) कंपनी होती. मात्र नुकतेच इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्सिअल सर्व्हिसेस डिफॉल्ट झाल्यानंतर पैसे मिळवण्याचा हा मार्गही बंद झाला.

बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राच्या माहितीनुसार, एनबीएफसीमधील आर्थिक संकटामुळे बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना विकले गेलेले घर टिकवून ठेवणे कठीण झाले आहे, असं रिअल रिसर्च फर्म प्रॉपइक्विटीचे सीईओ समीर जसूजा यांनी सांगितले.

या घटनेनंतर काही बांधकाम व्यावसायिकांनी व्याज परत करण्याच्या बाबतीत त्यांच्या करदात्यास डीफॉल्ट केले आहे. मागील तीन वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात विक्रींचे प्रमाण 3.2 टक्क्यांनी घटले आहे आणि विक्री न झालेल्या फ्लॅटच्या संख्येत 8.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *