360 डिग्री सुरक्षा, मेक इन इंडिया बुलेटप्रूफ जॅकेटची 100 देशात निर्यात

एकेकाळी बुलेटप्रुफ जॅकेट नसल्यामुळे अधिकारी शहीद झाल्याचा आरोप झाला होता (Bulletproof jacket). आज भारत जगातील 100 देशात 360 डिग्री सुरक्षा देणारे जॅकेट निर्यात करत आहे

360 डिग्री सुरक्षा, मेक इन इंडिया बुलेटप्रूफ जॅकेटची 100 देशात निर्यात

मुंबई : भारतात एकेकाळी बुलेटप्रुफ जॅकेट नसल्यामुळे अधिकारी शहीद झाल्याचा आरोप झाला होता (Bulletproof jacket). मात्र तोच भारत आज जगातील 100 देशात 360 डिग्री सुरक्षा देणारे जॅकेट (India exports bulletproof jackets) निर्यात करत आहे.  सर्वात जास्त जॅकेट निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आला आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

भारताने आपल्या निकषांनुसार 360 डिग्री सुरक्षा देणाऱ्या बुलेटप्रूफ जॅकेटची निर्यात 100 पेक्षा जास्त देशात करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही युरोपीय देशांचाही समावेश आहे. अमेरिका,ब्रिटन आणि जर्मनीनंतर राष्ट्रीय स्टॅण्डर्ड असलेलं बुलेटप्रूफ जॅकेट असलेला भारत चौथा देश आहे. हे जॅकेट 360 डिग्री सुरक्षा देतं.

निकषांच्या अभावामुळे दर्जेदार जॅकेट मिळवणे शक्य होत नव्हते. तसेच, सैन्यही अनेक काळापासून बुलेटप्रूफ जॅकेटसाठी निकष निश्चित केले जावे ही मागणी करत होते, असं बीआयएस (Bureau of Indian Standards)चे वैज्ञानिक जे.के. गुप्ता यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीती आयोगाच्या आदेशांनंतर 2018 मध्ये BIS ने बुलेटप्रूफ जॅकेटसाठी निकष निश्चित केले. हे निकष डिसेंबर 2018 मध्ये जाहीर करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

UNHRC : पाकिस्तानची खोटेपणाची कॉमेंट्री, काश्मीरप्रश्नी भारताचे खडेबोल

सैन्य भरतीला आलेले काश्मिरी तरुण म्हणाले, पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ, भारतासाठी बलिदानासाठीही तयार

…. म्हणून बेंजामिन नेतान्याहू यांचा भारत दौरा रद्द

शत्रूंना रात्रंदिवस धाकात ठेवणार, जगातील सर्वात ताकदवर हेलिकॉप्टर अपाचे भारतीय वायूसेनेत दाखल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *