भारत जगातील सर्वात विश्वसनीय देशांपैकी एक

दावोस : जगातील सर्वात विश्वसनीय देशांमध्ये भारताने आपलं स्थान प्रस्थापित केलं आहे. व्यवसाय, सरकार, स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांमध्ये भारत हा जगातील सर्वात विश्वासू देशांपैकी एक ठरला आहे. परंतु, व्यवसायीक ब्रँड्सच्या विश्वसनीयतेच्या बाबतीत आपला देश मागे पडला आहे. एका अहवालात याचा दावा करण्यात आला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक परिषद सुरु होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी एडलमन …

भारत जगातील सर्वात विश्वसनीय देशांपैकी एक

दावोस : जगातील सर्वात विश्वसनीय देशांमध्ये भारताने आपलं स्थान प्रस्थापित केलं आहे. व्यवसाय, सरकार, स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांमध्ये भारत हा जगातील सर्वात विश्वासू देशांपैकी एक ठरला आहे. परंतु, व्यवसायीक ब्रँड्सच्या विश्वसनीयतेच्या बाबतीत आपला देश मागे पडला आहे. एका अहवालात याचा दावा करण्यात आला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक परिषद सुरु होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी एडलमन ट्रस्ट बॅरोमीटर-2019 चा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये, भारत जागतिक विश्वसनीयता निर्देशांक यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 3 गुणांच्या सुधारणेने 52 गूण मिळवण्यात यशस्वी ठरला.

जागरूक नागरीक आणि सामान्य जनतेचा विश्वास या निर्देशांकानुसार चीन अनुक्रमे 79 आणि 88 गुणांसह आघाडीवर आहे. या दोन श्रेणींमध्ये भारत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. हे निर्देशांक एनजीओ, व्यवसाय, सरकार आणि माध्यमांमध्ये विश्वसनीयतेच्या  सरासरीवर आधारित आहेत. हे निष्कर्ष 27 बाजारपेठेतील ऑनलाईन सर्वेक्षणांवर आधारित आहेत. यात 33,000 पेक्षा जास्त लोकांनी आपली मतं नोदंवली आहेत.

ब्रँड विश्वासार्हतेनुसार, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि कॅनडा हे आघाडीवर आहेत. त्यानंतर जपानचा क्रमांक लागतो. तर, विश्वासार्हतेच्या बाबतीत भारत, मेक्सिको, ब्राझील आणि बांग्लादेश या देशांतील कंपन्या खालच्या स्थानावर आहेत. त्यानंतर चीन आणि दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *